झणझणीत बोंबील-मिरचीचा ठेचा; भाकरीसोबत लागेल भारी, वाचा रेसिपी

हा ठेचा भाकरी, भात किंवा पोळीबरोबर उत्तम लागतो. घरच्या घरी सहज बनवता येणारी ही रेसिपी आजही अनेकांच्या पसंतीस उतरते.
भाकरीसोबत भारी! झणझणीत बोंबील-मिरचीचा ठेचा, वाचा रेसिपी
भाकरीसोबत भारी! झणझणीत बोंबील-मिरचीचा ठेचा, वाचा रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

कोकण किनारपट्टीवरील पारंपरिक आणि झणझणीत चवीसाठी ओळखला जाणारा बोंबील-मिरचीचा ठेचा कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतो. हा ठेचा भाकरी, भात किंवा पोळीबरोबर उत्तम लागतो. घरच्या घरी सहज बनवता येणारी ही रेसिपी आजही अनेकांच्या पसंतीस उतरते.

भाकरीसोबत भारी! झणझणीत बोंबील-मिरचीचा ठेचा, वाचा रेसिपी
Sunday Special Recipe : फिश लव्हर्ससाठी खास! मालवणी स्टाईल सुरमई करी; ट्राय करा सोपी रेसिपी

साहित्य :

  • सुके बोंबील

  • तेल - १ टीस्पून

  • हिरव्या मिरच्या - ७ ते ८

  • लसूण पाकळ्या

  • जिरे - १ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

भाकरीसोबत भारी! झणझणीत बोंबील-मिरचीचा ठेचा, वाचा रेसिपी
घरच्या घरी बनवा चटपटीत पनीर सँडविच; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

कृती :

सर्वप्रथम सुके बोंबील स्वच्छ धुऊन कोरडे करून हलके भाजून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून परतून घ्या. आता भाजलेले बोंबील घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा. हे मिश्रण थंड झाल्यावर खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. शेवटी मीठ आणि कोथिंबीर घातली की बोंबील-मिरचीचा ठेचा तयार!

भाकरीसोबत भारी! झणझणीत बोंबील-मिरचीचा ठेचा, वाचा रेसिपी
Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त

टिप्स :

  • बोंबील आधी भाजून घेतले तर रुचकर लागतात.

  • जास्त तिखट हवे असल्यास सुक्या लाल मिरच्याही वापरू शकता.

  • मिक्सरऐवजी खलबत्त्यात वाटल्यास अजून छान चव येते.

  • थोडासा लिंबाचा रस घातल्यास तिखटपणा कमी होतो.

logo
marathi.freepressjournal.in