कोकणची पारंपरिक चव! घरच्या घरी बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची झणझणीत भाजी 'एआय'ने संपादित केलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

कोकणची पारंपरिक चव! घरच्या घरी बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची झणझणीत भाजी

कोकणातील पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची झणझणीत भाजी. ओल्या खोबऱ्याची चव आणि मसालेदार फोडणीमुळे रेसिपी लागते अप्रतिम.

Mayuri Gawade

मे महिना सुरू झाला की कोकणात फणसाचा सुगंध दरवळू लागतो. पिकलेल्या फणसाचे गरे खाण्याइतकंच कच्च्या फणसापासून बनणारे पदार्थही कोकणात आवडीने खाल्ले जातात. विशेषतः कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी ही अनेक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवली जाते.

मसालेदार फोडणी, लसूण, कांदा आणि ओल्या खोबऱ्याची चव यामुळे ही भाजी साध्या भाकरीसोबत आणि उकड्या तांदळाच्या पेजेसोबत अप्रतिम लागते. कमी साहित्यांत तयार होणारी ही कोकणी रेसिपी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते.

साहित्य

  • कच्च्या फणसाचे गरे

  • १ कांदा

  • ओल्या खोबऱ्याचा किस

  • लसूण पाकळ्या

  • मोहरी

  • जिरे

  • हिंग

  • सुकी लाल मिरची

  • हळद

  • लाल तिखट

  • मीठ

  • तेल किंवा तूप

कृती

सर्वप्रथम कच्चा फणस कापून त्यातील गरे वेगळे काढून घ्या. गऱ्यांची साल काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. फणसाच्या आठळ्याही बारीक चिरून वापरू शकता.

यानंतर गऱ्यांना मीठ घातलेल्या पाण्यात काही वेळ भिजत ठेवा.

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, सुकी लाल मिरची आणि ठेचलेला लसूण घालून फोडणी द्या.

फोडणी खमंग झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मसाला भाजून घ्या.

आता त्यात फणसाचे गरे घालून चांगले मिक्स करा. थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या.

गरे मऊ शिजल्यानंतर वरून ओल्या खोबऱ्याचा किस घालून पुन्हा हलक्या हाताने मिक्स करा.

भाकरीसोबत लागते जबरदस्त

ही भाजी गरमागरम भाकरी, पोळी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत अधिक चविष्ट लागते. कोकणातील पारंपरिक चव अनुभवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

कच्चा फणस आरोग्यासाठीही फायदेशीर

कच्च्या फणसामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे ही भाजी चवदार असण्यासोबतच पौष्टिकही मानली जाते.

म्हाडाला सदनिकेची किंमत वाढवण्याचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

'एसआयआर'खाली सहा कोटी मतदार 'कटाप'

Mumbai : जेजे, माया ब्लड सेंटरचा रक्तपेढी परवाना रद्द; नियमांचे उल्लंघन केल्याने FDA ने केली कारवाई

पोलिसांच्या मते चेतन हाच सूत्रधार; 'सियाला केतनविरुद्ध भडकवले, शेवटचा धक्काही त्यानेच दिला'

राज्यात पावसाची तूर्त विश्रांती; जुलैपासून पुन्हा पडणार; हवामान खात्याचा अंदाज