Freepik
लाईफस्टाईल

Joke of The Day: शेखर - 'आई, बघ टकला माणूस'...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मजेदार जोक्स.

> मित्रः- कुठे आहेस ?

मीः- लेक्चर मध्ये आहे..

मित्र :- कोणता विषय आहे?

मी:- घरच्या लेक्चर मध्ये आहे

आणि विषय मीच आहे

> शेखर -- 'आई, बघ टकला माणूस.'

आई-- 'शांत रहा, तो ऐकेल ना.'

शेखर -- 'काय त्याला हे माहित नाही?'

> विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला, 'आई संजयने माझी पाटी फोडली.' 'कशी फोडली? थांब बघते मी संजयला.'

'मी त्याच्या डोक्यावर आपटली आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.'

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी