लाईफस्टाईल

Sunday Special Recipe : फिश लव्हर्ससाठी खास! मालवणी स्टाईल सुरमई करी; ट्राय करा सोपी रेसिपी

रविवारी घरात काहीतरी खास बनवायचे असेल तर मालवणी स्टाईल सुरमई करी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मसाल्यांचा सुगंध, नारळाची चव आणि चिंचेची आंबट चव यामुळे ही करी अतिशय चविष्ट लागते.

किशोरी घायवट-उबाळे

मालवणी खाद्यसंस्कृती ही तिच्या खास मसाल्यांसाठी आणि झणझणीत चवीसाठी ओळखली जाते. नारळ, लाल मिरची, कोकम किंवा चिंच यांचा वापर करून तयार केलेले पदार्थ चवीला वेगळे आणि स्वादिष्ट लागतात. विशेषतः मासे खाणाऱ्यांसाठी मालवणी फिश करी हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. रविवारी घरात काहीतरी खास बनवायचे असेल तर मालवणी स्टाईल सुरमई करी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मसाल्यांचा सुगंध, नारळाची चव आणि चिंचेची आंबट चव यामुळे ही करी अतिशय चविष्ट लागते.

साहित्य :

  • ५०० ग्रॅम सुरमईचे तुकडे

  • १ टीस्पून जिरे

  • २ टीस्पून धणे

  • ४ ते ५ सुक्या लाल मिरच्या

  • चिमूटभर हळद

  • १ मध्यम कांदा (जाडसर चिरलेला)

  • १/२ कप ताजे किसलेले खोबरे

  • ६ ते ८ काळी मिरी

  • ३ टेबलस्पून तेल

  • १ मध्यम कांदा (बारीक चिरलेला)

  • १ मध्यम टोमॅटो (बारीक चिरलेला)

  • चवीनुसार मीठ

  • १ टेबलस्पून चिंचेचा कोळ

  • कोथिंबीर - सजावटीसाठी

कृती :

सर्वप्रथम कढईत जिरे आणि धणे १ मिनिट हलके भाजून घ्या. त्यात सुक्या लाल मिरच्या आणि हळद घालून बारीक पूड तयार करा. मिक्सरमध्ये जाडसर चिरलेला कांदा, खोबरे, काळी मिरी आणि थोडे पाणी घालून जाडसर वाटण तयार करा. कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परता. त्यात टोमॅटो आणि मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. दरम्यान सुरमईच्या तुकड्यांना मीठ आणि तयार मसाला लावून ५ मिनिटे बाजूला ठेवा.

कांदा-टोमॅटो मसाल्यात तयार केलेले खोबऱ्याचे वाटण घालून चांगले परता. आता अडीच कप पाणी घालून ग्रेव्हीला उकळी आणा. त्यात सुरमईचे तुकडे घालून झाकण ठेवून ५ ते ६ मिनिटे शिजवा. शेवटी चिंचेचा कोळ घालून २ ते ३ मिनिटे मंद आचेवर उकळवा. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

  • अधिक पारंपरिक चव हवी असल्यास कोकमही वापरू शकता.

  • मासे जास्त हलवू नका, नाहीतर तुकडे तुटू शकतात.

  • ही करी भात किंवा भाकरीसोबत खूप चविष्ट लागते.

  • ताजे खोबरे वापरल्यास चव अधिक उत्तम येते.

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी

नवस पूर्ण करण्यासाठी हत्तीच्या मूर्तीखालून रांगत गेला; पण पुढे घडलं असं काही की मदतीसाठी धावले भाविक, Video व्हायरल