Milind Soman jogs barefoot at 3 degrees in Switzerland
लाईफस्टाईल

Milind Somanने ३ डिग्री तापमानात अनवाणी पायांनी केले जॉगिंग, जाणून घ्या फायदे

Tejashree Gaikwad

Fitness Secrets of Celebrities: प्रसिद्ध अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण सतत चर्चेत असतो. त्याच्या फिटनेसच्या चर्चा जगभरात होतात. मिलिंद सोमण वयाच्या ५८ व्या वर्षीही भरपूर वर्कआउट करतो. मिलिंद सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. नुकतीच त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो स्वित्झर्लंडमधील ग्रिंडेलवाल्डमध्ये ३ डिग्री तापमानात फुटवेअर न घालता जॉगिंग ( benefits of jogging) करताना दिसत आहे. या पोस्टची चर्चा सर्वत्र होत आहे. चला याच निमित्ताने जॉगिंग करण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात.

मिलिंद सोमणची पोस्ट

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले '३ डिग्री! कधी कधी बर्फ पडतो तेव्हा माझे हात पायांपेक्षा थंड वाटतात. याचे कारण अद्याप कळलेले नाही.. कदाचित माझे हात माझे कमकुवत आहेत आणि मला त्यावर अधिक काम करण्याची गरज आहे.' मिलिंदच्या या पोस्टवरून समजते की जॉगिंग करणे किती फायदेशीर ठरते.

जॉगिंग करण्याचे काय फायदे आहेत?

  • जॉगिंगमुळे पाय, मुख्य स्नायू मजबूत होतात. यामुळे हाडे मजबूत होण्यास आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते.

  • जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही आवर्जून जॉगिंग करायला हवी.

  • जॉगिंग केल्याने सांध्यातील लवचिकता वाढते आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.

  • स्किन केअरमध्येही जॉगिंगचा फायदा होतो. हे त्वचेचा पोत सुधारायला मदत करते.

  • रोज जॉगिंग केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

  • जॉगिंग हा कॅलरी बर्न करण्याचा एक उत्तम मार्ग आहे, ज्यामुळे वाढणारे वजन कमी होण्यास मदत होते.

  • जॉगिंग केल्याने मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त