पावसाळ्यात गरमागरम भुट्टा तर नेहमीच खाता; यावेळी ट्राय करा रेस्टॉरंट स्टाईल कॉर्न सूप! 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

पावसाळ्यात गरमागरम भुट्टा तर नेहमीच खाता; यावेळी ट्राय करा रेस्टॉरंट स्टाईल कॉर्न सूप!

पावसाळ्यात घरच्या घरी हॉटेलसारखं घट्ट आणि क्रीमी कॉर्न सूप कसं बनवायचं? जाणून घ्या सोपी रेसिपी, आवश्यक साहित्य आणि चव वाढवणाऱ्या खास टिप्स.

Mayuri Gawade

पावसाळा सुरू झाला की गरमागरम भुट्टा खाण्याची मजाच काही वेगळी असते. पण यावेळी भुट्ट्याबरोबर त्याच मक्यापासून बनणारं गरमागरम कॉर्न सूपही एकदा नक्की ट्राय करा. हॉटेलमध्ये मिळणारं घट्ट, क्रीमी आणि चवदार कॉर्न सूप आता घरच्या घरी अगदी सहज तयार करता येतं. काही साध्या भाज्या आणि मक्याच्या दाण्यांच्या मदतीने तयार होणारं हे सूप चवदार तर आहेच, शिवाय पावसाळ्यात शरीराला उबही देतं.

साहित्य

  • मक्याचे दाणे

  • हिरवी मिरची

  • आलं

  • लसूण

  • कांद्याची पात

  • गाजर

  • कोबी

  • मीठ

  • काळी मिरी पूड

  • कॉर्नफ्लावर

  • लोणी किंवा बटर

  • पाणी

कृती

१. मक्याची पेस्ट तयार करा
सर्वप्रथम मक्याचे दाणे उकळून घ्या. त्यातील थोडे दाणे बाजूला ठेवा. उरलेले दाणे थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटा आणि गाळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

२. भाज्यांची तयारी करा
लसूण, आलं, हिरवी मिरची, कांद्याची पात, गाजर आणि कोबी बारीक चिरून घ्या. या भाज्या कमी प्रमाणात वापरा, कारण या रेसिपीचा मुख्य स्वाद मक्याचा असतो.

३. सूप तयार करा
कढईत बटर किंवा लोणी गरम करून त्यात लसूण परता. त्यानंतर आलं, हिरवी मिरची, कांद्याची पात, गाजर आणि कोबी घालून हलकं परतून घ्या. आता बाजूला ठेवलेले मक्याचे दाणे आणि तयार केलेली मक्याची पेस्ट घाला. त्यात मीठ आणि काळी मिरी पूड मिसळा.

४. सूपला क्रीमी टेक्स्चर द्या
आवश्यकतेनुसार पाणी घालून सूप उकळू द्या. एका वाटीत कॉर्नफ्लावर आणि थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा व ती सूपमध्ये घाला. सूप घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. शेवटी भरपूर लोणी किंवा बटर घालून गॅस बंद करा.

अधिक चवदार बनवण्यासाठी टिप्स

  • लोणी वापरल्यास सूप अधिक चविष्ट लागते.

  • वरून थोडी काळी मिरी आणि कांद्याची पात घातल्यास चव आणखी खुलते.

  • गरमागरम सर्व्ह केल्यास पावसाळ्यात याची मजा दुप्पट होते.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके