लाईफस्टाईल

Navratri 2025 Date: शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात कधी? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी

गणेशोत्सवाचा जल्लोष संपताच भक्तांमध्ये नव्या उत्सवाची लगबग सुरू होते. तो म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव. यंदाच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार, अश्विन...

Mayuri Gawade

गणेशोत्सवाचा जल्लोष संपताच भक्तांमध्ये नव्या उत्सवाची लगबग सुरू होते. तो म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव. भारतभर मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणारा हा सण यंदा २२ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक दिवस वेगळा आणि विशेष मानला जातो. यंदाच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि नवरात्रीतील सर्व तिथींची माहिती जाणून घेऊयात.

घटस्थापना शुभ मुहूर्त २०२५

हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला घटस्थापना केली जाते. यंदा हा दिवस २२ सप्टेंबर २०२५ आहे. रात्री ०१ वाजून २३ मिनिटांनी घटस्थापना सुरू होईल, तर हा शुभ मुहूर्त २३ सप्टेंबर रोजी पहाटे ०२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत कायम राहील. या कालावधीत देवीची पूजा सर्वाधिक फलदायी मानली जाते.

घटस्थापना पूजा पद्धत २०२५

  • घटस्थापनेपूर्वी घराची नीट साफसफाई करावी.

  • त्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.

  • देवघर स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे आणि शुद्ध करावे.

  • उत्तर किंवा ईशान्य दिशेला पांढरे कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.

  • कलश स्थापनेसाठी मातीच्या भांड्यात धान्य टाकावे.

  • तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल भरावे.

  • कलशावर धागा बांधून कुंकवाने स्वस्तिक काढावे.

  • कलशात अक्षता, सुपारी आणि नाणे ठेवावे. त्यावर चुनरी बांधून नारळ ठेवावा.

  • या सर्वानंतर विधीपूर्वक देवीची पूजा करावी, फळे व मिठाई अर्पण करावी.

  • दुर्गा सप्तशतीचा पाठ करून शेवटी आरती व प्रसादाचे वाटप करावे.

शारदीय नवरात्री २०२५ तिथी

  • दिवस १ - २२ सप्टेंबर २०२५, सोमवार - घटस्थापना, शैलपुत्री पूजा

  • दिवस २ - २३ सप्टेंबर २०२५, मंगळवार - ब्रह्मचारिणी पूजा

  • दिवस ३ - २४ सप्टेंबर २०२५, बुधवार - चंद्रघंटा पूजा

  • दिवस ४ - २५ सप्टेंबर २०२५, गुरुवार - कुष्मांडा पूजा

  • दिवस ५ - २६ सप्टेंबर २०२५, शुक्रवार - स्कंदमाता पूजा

  • दिवस ६ - २७ सप्टेंबर २०२५, शनिवार - कात्यायनी पूजा

  • दिवस ७ - २८ सप्टेंबर २०२५, रविवार - जगदंबा पूजा

  • दिवस ८ - २९ सप्टेंबर २०२५, सोमवार - सिद्धीदात्री पूजा

  • दिवस ९ - ३० सप्टेंबर २०२५, मंगळवार - सिद्धीदात्री पूजा

  • दिवस १० - २ ऑक्टोबर २०२५, गुरुवार - नवमी हवन, दुर्गा विसर्जन, विजयादशमी, दसरा, शस्त्रपूजा

यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात भक्तांनी योग्य शुभ मुहूर्तात घटस्थापना करून, विधीपूर्वक देवीची पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी आणि मंगलकार्याची भरभराट होते, असा विश्वास आहे.

Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार

NEET पेपरफुटी हे ‘घोर पाप’; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

बिर्ला यांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात; बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला आव्हान

मुंबईत दुसऱ्या दिवशीही जोरदार निदर्शने; आतापर्यंत ९०० जणांवर गुन्हे, ठाकरे गट कायदेशीर मदत देणार

दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना रोखले; भारत-अमेरिका कराराविरोधात किसान पंचायत आक्रमक