Bodybuilder Bride : नववधूचे चक्क '६-पॅक अ‍ॅब्स' फोटोशूट! कोण आहे ही महिला? व्हायरल व्हिडिओवर नेटकरी फिदा, म्हणाले... Chitra Purushotham - Instagram
लाईफस्टाईल

Bodybuilder Bride : नववधूचे चक्क '६-पॅक अ‍ॅब्स' फोटोशूट! कोण आहे ही महिला? व्हायरल व्हिडिओवर नेटकरी फिदा, म्हणाले...

नववधूच्या पारंपारिक वेशात तिने बायसेप्स (biceps - ६-पॅक अ‍ॅब्स) दाखवत फोटो आणि व्हिडिओ (Bodybuilder Bride) शेअर केले आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर इतके प्रचंड व्हायरल झाले आहे की जणू काही सोशल मीडियावर नेटिझन्सचे चक्रीवादळच आले की काय, असे वाटत आहे.

Kkhushi Niramish

आजच्या काळात प्रत्येक जण आपल्या लग्नाचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोशल मीडियावर एका महिलेने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. नववधूच्या पारंपारिक वेशात तिने बायसेप्स (biceps - ६-पॅक अ‍ॅब्स) दाखवत फोटो आणि व्हिडिओ (Bodybuilder Bride) शेअर केले आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर इतके प्रचंड व्हायरल झाले आहे की जणून काही सोशल मीडियावर नेटिझन्सचे चक्रीवादळच आले की काय, असे वाटत आहे. सामान्यपणे लग्नावेळी मुलींकडून नवरीच्या पारंपारिक वेशात मेहंदी लावून, लाजत फोटो काढून ते शेअर केले जातात. समाजही नववधूकडून अशीच अपेक्षा करतो. मात्र या सामाजिक नियमांना तिने छेद दिला आहे. सौंदर्य, ताकद आणि परंपरा यांचा संगम साधत हटके फोटोंमुळे ती मोठ्या चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घ्या कोण आहे ही बॉडीबिल्डर महिला...

सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडिओ आणि फोटो कर्नाटकातील बॉडीबिल्डर चित्रा पुरुषोत्तम हिचा आहे. चित्राने यापूर्वी मिस इंडिया फिटनेस अँड वेलनेसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोंमुळे जिम आणि व्यायामाच्या क्षेत्रात सौंदर्य कसे विस्तारत आहे याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

सोशल मीडियावरील तिच्या फोटोत तिने कांजीवरम साडी नेसल्याचे दिसत आहे. तिच्या साडी ड्रेपिंग स्टाईलने देखील तिच्याकडे खास लक्ष वेधले जात आहे. या साडीवर तिने खास दाक्षिणात्य पद्धतीचे पारंपारिक दागिने घातले आहेत. यासोबतच केसांची छान वेणी आणि दाक्षिणात्य पद्धतीने गजरा माळला आहे. या पोशाखाला साजेल असा मेकअप तिने केला आहे. तिच्या ओठांवरील गडद मरून रंगाच्या लिप्स्टिकमुळे तिचा चेहरा खुलून दिसत आहे. तर गालाच्या वरच्या भागावरील मेकअप हा ओठांच्या लिप्स्टिकला आणखी खुलवत आहे. चित्राने काळ्या विंग्ड आयलाइनरचा एक तीव्र स्ट्रोक आणि वॉटरलाइनवर कोहलचा थोडासा थर लावला आहे. मस्काराने लेपित केलेल्या फॉक्स आयलॅशेसने तिच्या डोळ्यांना खोली दिली. चमकदार निळे आयशॅडो तिच्या साडीचा रंगाला ते मॅच करत आहे.

या पोशाखात ती बॉडीबिल्डिंगचे प्रात्यक्षिक करताना दिसत आहे. ब्रायडल लूकमध्येही ती आत्मविश्वासाने तिचे बायसेप्स (biceps) दाखवत आहे. त्याचवेळी तिच्या चेहऱ्यावर सुंदर स्मितहास्य आहे. या अनोख्या फोटोशूटमुळे तिने नववधूचा लूक कसा असावा याच्या पारंपारिक सौंदर्यशास्त्राला तिने थेट आव्हान दिले आहे. चित्राचा लूक पाहून असे वाटत आहे जणू काही ती लग्नाच्या पोशाखातच रिंगमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे. नेटकऱ्यांनी तशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटिझन्सनी तिच्या फिटनेसच्या समर्पणाचे कौतुक केले आहे. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, "तिचे सासू-सासरे तिच्याशी वाद घालण्यापूर्वी नेहमीच दोनदा विचार करतील!" दुसऱ्याने म्हटले, "सोन्याच्या दागिन्यांसह, तिने तिचे बॉडीबिल्डिंग पदके देखील घालावीत."

बॉडीबिल्डर चित्रा पुरुषोत्तम सोशल मीडियावर चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती मिस इंडिया फिटनेस अँड वेलनेस आणि मिस साउथ इंडिया देखील आहे. तिने मिस कर्नाटक आणि मिस बंगळुरूसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत. तिने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड किरण राज याच्याशी लग्न केले आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर १३६K फोलोअर्स आहेत. चित्राने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे स्त्री सौंदर्यशास्त्राच्या सामाजिक मानकांची पुनर्परिभाषा करीत आहे, असेच दिसते. तिच्या या अनोख्या फोटो आणि व्हिडिओ शूटवर नेटिझन्स खूपच मोहित झाले आहेत.

सरकारचे तंत्रकठोर नियम! एआयसाठी ‘कायमस्वरूपी’ लेबल; ऑनलाइन गेमिंगसाठीही नवीन नियमावली जाहीर

मुंबई-गोवा महामार्गावर जूनपासून टोल वसुली? ओसरगाव टोल नाक्याची निविदा प्रसिद्ध, किती पैसे मोजावे लागणार?

US-Iran Ceasefire: इराणसोबतचा शस्त्रसंधीचा करार अनिश्चित काळासाठी वाढवण्याची ट्रम्प यांची घोषणा; आर्थिक नाकेबंदी मात्र कायम

Mumbai : राणीबागेत लवकरच सिंह गर्जना घुमणार; महापौर गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाची पाहणी करणार

रोहित-धोनीचं आज पुनरागमन? वानखेडेवर मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स भिडणार; आयुष म्हात्रेच्या जागी 'या' तरुण खेळाडूची वर्णी?