लाईफस्टाईल

Oats Cutlet Recipe : हेल्दी आणि चविष्ट नाश्त्यासाठी बनवा ओट्स कटलेट्स!

फायबरने भरलेले ओट्स आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध भाज्या यामुळे हे कटलेट्स मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. पार्टी असो, टिफिन असो किंवा चहाची वेळ हे कुरकुरीत कटलेट्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरतील.

Mayuri Gawade

आरोग्यदायी खाणं नेहमीच कंटाळवाणं असतं असं नाही. अगदी पौष्टिक आणि झटपट तयार होणारा ओट्स कटलेट हा त्याचं उत्तम उदाहरण आहे. फायबरने भरलेले ओट्स आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध भाज्या यामुळे हे कटलेट्स मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. पार्टी असो, टिफिन असो किंवा चहाची वेळ हे कुरकुरीत कटलेट्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरतील.

साहित्य

  • ओट्स - १ कप (रोल्ड किंवा क्विक ओट्स)

  • उकडलेले बटाटे - २ मध्यम आकाराचे (मॅश केलेले)

  • गाजर - १ (किसलेले)

  • कोबी - ½ कप (बारीक चिरलेले)

  • सिमला मिरची - ½ कप (बारीक चिरलेली)

  • मटार - ¼ कप (उकडलेले)

  • आले-हिरव्या मिरचीची पेस्ट - १ चमचा

  • लाल तिखट - ½ चमचा

  • गरम मसाला - ½ चमचा

  • धणे पानं - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

  • मीठ - चवीनुसार

  • लिंबाचा रस - १ चमचा

  • ब्रेड क्रम्ब्स - ½ कप

  • तेल - शॅलो फ्रायसाठी

कृती

सर्वप्रथम ओट्स एका पॅनमध्ये कोरडे भाजून घ्या. एका मोठ्या भांड्यात बटाटे, गाजर, कोबी, सिमला मिरची आणि मटार एकत्र करा. त्यात आले-मिरची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, लिंबाचा रस, मीठ आणि धणे पाने घालून नीट मिसळा. आता भाजलेले ओट्स यात टाका आणि पुन्हा सर्व मिश्रण छान एकत्र करा. मिश्रणाचे लहान भाग घेऊन कटलेटचा आकार द्या. ते ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवा आणि मध्यम आचेवर शॅलो फ्राय करून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होऊ द्या. हवे असल्यास कटलेट्स एअर फ्रायर किंवा ओव्हनमध्ये बेकही करू शकता.

गरमागरम ओट्स कटलेट्स हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती