संध्याकाळच्या भुकेसाठी भन्नाट पर्याय! घरच्या घरी बनवा चीजी 'पनीर स्लायडर्स' 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

संध्याकाळच्या भुकेसाठी भन्नाट पर्याय! घरच्या घरी बनवा चीजी 'पनीर स्लायडर्स'

मऊ लादीपाव, मसालेदार पनीरची स्टफिंग आणि वितळलेल्या चीजची चव एकत्र अनुभवायची असेल तर घरच्या घरी पनीर स्लायडर्स नक्की बनवा. संध्याकाळचा नाश्ता, किटी पार्टी किंवा होम पार्टीसाठी हा झटपट आणि टेस्टी पर्याय ठरेल.

Mayuri Gawade

दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी काहीतरी चटपटीत, झटपट आणि वेगळं खावंसं वाटतं. अशावेळी नेहमीचे वडा-पाव, सँडविच किंवा भेळ यांना ब्रेक देऊन एक नवा पदार्थ ट्राय करू शकता. घरच्या घरी सहज तयार होणारे पनीर स्लायडर्स हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

मऊ लादीपाव, मसालेदार पनीरची भरपूर स्टफिंग, चटणी, सॉस आणि वितळलेलं चीज यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. घरातील छोट्या पार्टीसाठी, किटी पार्टीसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठीही हा पदार्थ परफेक्ट ठरू शकतो. कमी वेळात आणि कमी साहित्यांत तयार होणारी ही रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य

  • लादीपाव - ६ ते ८

  • पनीर - २०० ग्रॅम (किसलेले किंवा छोटे तुकडे)

  • कांदा - १ बारीक चिरलेला

  • ढोबळी मिरची - १ बारीक चिरलेली

  • बटर - २ ते ३ चमचे

  • तेल - १ चमचा

  • शेजवान सॉस / पिझ्झा सॉस - २ चमचे

  • मेयोनेझ - १ चमचा (ऐच्छिक)

  • चीज स्लाइस किंवा किसलेले चीज

  • लाल तिखट - अर्धा चमचा

  • ओरेगॅनो - १ चमचा

  • चिली फ्लेक्स - अर्धा चमचा

  • मीठ - चवीनुसार

  • हिरवी चटणी - २ चमचे

कृती

सुरुवातीला कढईत तेल आणि थोडं बटर गरम करून त्यात कांदा व ढोबळी मिरची हलके परतून घ्या. भाज्या जास्त शिजवू नका, थोडा कुरकुरीतपणा राहू द्या.

यानंतर त्यात पनीर, सॉस, लाल तिखट, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून सर्व मिश्रण छान हलवा. दोन मिनिटांनी गॅस बंद करा.

आता लादीपाव आडवे कापून खालच्या भागावर हिरवी चटणी आणि वरच्या भागावर मेयोनेझ लावा. मध्ये तयार पनीरचं मिश्रण भरा. त्यावर चीज टाका आणि वरचा भाग ठेवून बंद करा.

पॅनमध्ये बटर गरम करून स्लायडर्स मंद आचेवर दोन्ही बाजूंनी भाजा. चीज वितळलं की गरमागरम स्लायडर्स तयार.

टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा आणि घरच्यांसोबत मजा घ्या.

NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा

Mira Road : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मद्यपान करणाऱ्यांना मनसेचा दणका; VIDEO व्हायरल

हनिमूनला अख्खं कुटुंबच घेऊन गेला; पत्नीने थेट घटस्फोट मागितला

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : 'मीटरने चला' म्हटलं तर ३०० रुपयांची मागणी! BKC सार्वजनिक वाहतूक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांविरोधात तक्रारी