

उन्हाळा म्हटलं की थंडगार पेयांची आठवण येते. सरबत आणि ज्यूस आपण नेहमीच पितो, पण यंदा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर घरच्या घरी बनवलेला संत्र्याचा सोडा एकदम परफेक्ट पर्याय ठरतो. आंबट-गोड संत्र्याची चव, पुदिन्याचा ताजेपणा आणि सोड्याची फिज यामुळे हा ड्रिंक प्रकार केवळ चविष्टच नाही, तर खूपच रिफ्रेशिंग वाटतो.
बाजारातील रेडीमेड ड्रिंक्सपेक्षा हा सोडा अधिक नैसर्गिक आणि आपल्या चवीप्रमाणे बनवता येतो. गरमीमुळे थकवा, घाम आणि शरीरातील पाण्याची कमतरता जाणवत असेल, तर हा संत्र्याचा सोडा लगेच फ्रेश वाटायला मदत करतो.
साहित्य :
संत्री, साखर, लिंबू, मीठ, पुदिना, बर्फ, सोडा
कृती :
सर्वप्रथम संत्री सोलून त्याचा रस काढून घ्या.
हा रस मिक्सरमध्ये घालून त्यात साखर, लिंबाचा रस, मीठ आणि पुदिन्याची पाने टाका.
सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत ब्लेंड करा.
नंतर हे मिश्रण गाळून घ्या, म्हणजे चोथा वेगळा होईल.
ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून त्यावर तयार मिश्रण ओता.
शेवटी थंड सोडा घालून हलकेच ढवळा.
तयार झालेला संत्र्याचा सोडा लगेच सर्व्ह करा. वरून पुदिन्याची पाने किंवा संत्र्याचा स्लाइस घालून सजवल्यास तो अधिक आकर्षक दिसतो.
संत्र्याचा सोडा पिण्याचे फायदे
संत्र्यामधील व्हिटामिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत
लिंबू आणि मीठामुळे इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात
पुदिन्यामुळे पचन सुधारते आणि ताजेतवानेपणा मिळतो
उष्णतेमुळे आलेला थकवा कमी होतो
उन्हाळ्याच्या कडक उन्हात घरच्या घरी बनवलेला हा संत्र्याचा सोडा तुम्हाला ताजेतवाने ठेवेल. चव, आरोग्य आणि रिफ्रेशमेंट यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला हा ड्रिंक नक्की ट्राय करा!