सकाळच्या घाईतही तयार होईल झटपट नाश्ता; ट्राय करा पोहे-बटाट्याचे क्रिस्पी बाइट्स 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

सकाळच्या घाईतही तयार होईल झटपट नाश्ता; ट्राय करा पोहे-बटाट्याचे क्रिस्पी बाइट्स

सकाळच्या घाईतही झटपट तयार होणारा आणि चविष्ट नाश्ता हवा आहे का? पोहे, बटाटा आणि बेसनापासून बनवा कुरकुरीत क्रिस्पी बाइट्स. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेला हा नाश्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. झटपट तयार होणारी ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

Mayuri Gawade

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. त्यामुळे नाश्ता चविष्ट, पोटभरणीचा आणि पटकन तयार होणारा असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र रोज पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन अनेकदा कंटाळा येतो. अशावेळी घरात सहज उपलब्ध असलेल्या पोहे, बटाटा आणि बेसनापासून तयार होणारे कुरकुरीत बाइट्स हा एक भन्नाट पर्याय ठरू शकतो.

बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेले हे पोहे-बटाटा बाइट्स मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. विशेष म्हणजे हे मिश्रण आधी तयार करून ठेवता येते. त्यामुळे सकाळची घाई असली तरी काही मिनिटांत गरमागरम नाश्ता तयार होतो.

साहित्य

  • १ कप जाड पोहे

  • १ मध्यम आकाराचा बटाटा

  • १/४ कप बेसन

  • १/४ कप पाणी

  • १ ते २ टेबलस्पून तेल

  • चिमूटभर हिंग

  • १/२ टीस्पून जिरे

  • १ टीस्पून आले-लसूण पेस्ट

  • १ टीस्पून चिली फ्लेक्स

  • १ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)

  • १ टीस्पून पांढरे तीळ

  • १/२ टीस्पून ओवा

  • १/४ टीस्पून काळी मिरी पावडर

  • १/४ टीस्पून कलौंजी

  • १/२ टीस्पून गरम मसाला

  • चवीनुसार मीठ

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • तळण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुवून काही मिनिटे भिजत ठेवा. पोहे मऊ झाल्यानंतर ते चांगले मॅश करून घ्या. त्यामध्ये बेसन आणि पाणी घालून एकसारखे मिश्रण तयार करा.

आता बटाटा किसून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे आणि आले-लसूण पेस्ट परता. त्यानंतर किसलेला बटाटा घालून थोडावेळ शिजवा.

यानंतर चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, तीळ, ओवा, काळी मिरी पावडर, कलौंजी, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

तयार मिश्रणात पोहा-बेसनचे मिश्रण आणि कोथिंबीर घालून मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर ते ताटात किंवा ट्रेमध्ये पसरवून काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा.

मिश्रण सेट झाल्यावर त्याचे आवडीनुसार चौकोनी किंवा त्रिकोणी तुकडे करा. गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तयार झालेले कुरकुरीत बाइट्स हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

विशेष म्हणजे हे कच्चे बाइट्स एअरटाइट डब्यात भरून ३ ते ४ दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेवता येतात. त्यामुळे वेळेअभावीही झटपट चविष्ट नाश्ता तयार करता येतो.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके