(Photo-Yandex)
लाईफस्टाईल

Roasted Makhana : हेल्दी स्नॅकसाठी उत्तम पर्याय; घरी बनवा कुरकुरीत मखाना, वाचा सोपी रेसिपी

वजन कमी करायचे असो, मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असो किंवा हेल्दी स्नॅक असो, भाजलेले मखाना हा उत्तम पर्याय मानला जात आहे.

किशोरी घायवट-उबाळे

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्यदायी आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थांना मोठी मागणी आहे. अशातच कमी कॅलरी, जास्त प्रोटीन आणि फायबरने भरलेले मखाना (Fox Nuts) आरोग्याबाबत जागरूक असलेल्या लोकांची पहिली पसंती ठरत आहेत. वजन कमी करायचे असो, मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असो किंवा हेल्दी स्नॅक असो, भाजलेले मखाना हा उत्तम पर्याय मानला जात आहे. घरी अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्य वापरून मखाना कसे भाजायचे, जाणून घेऊया ही सोपी रेसिपी.

साहित्य :

  • २ कप मखाना

  • १ ते २ चमचे तूप (किंवा तेल)

  • मीठ - चवीनुसार

  • काळी मिरी पावडर - अर्धा चमचा

  • लाल तिखट - अर्धा चमचा (ऐच्छिक)

  • चाट मसाला / ओवा पावडर - चवीनुसार

कृती :

कढई मंद आचेवर ठेवा आणि त्यात तूप घाला. तूप वितळल्यानंतर त्यात मखाना घालून सतत हलवत राहा आणि भाजून घ्या. मखाना कुरकुरीत होईपर्यंत (५-७ मिनिटे) भाजत राहा. गॅस बंद करून त्यात मीठ, मिरी, तिखट आणि चाट मसाला घाला. सर्व मसाले नीट मिसळा. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. हेल्दी, कुरकुरीत आणि स्वादिष्ट रोस्टेड मखाना तयार!

आरोग्यासाठी उपयुक्त

मखाना खाल्ल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मधुमेह रुग्णांसाठी मखाना उपयुक्त ठरतो. याच्या सेवनाने पचन सुधारते तसेच हे हृदयासाठी फायदेशीर आहे.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग