लाईफस्टाईल

Valentine's Week : ७ फेब्रुवारीला रोज डे; लाल की पिवळा? कोणता गुलाब कोणाला द्याल? जाणून घ्या रंगांचा अर्थ

'रोज डे' म्हणजे फक्त गुलाब देण्याचा दिवस नाही, तर योग्य रंगाचा गुलाब निवडून आपल्या भावना व्यक्त करण्याचा खास प्रसंग आहे. प्रत्येक गुलाबाच्या रंगामागे वेगवेगळा अर्थ दडलेला असतो.

किशोरी घायवट-उबाळे

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच अनेकांना 'व्हॅलेंटाईन डे' चे वेध लागतात. उद्यापासून, म्हणजेच ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होत असून अनेक 'लव्ह बर्ड्स' यासाठी उत्सुक आहेत. प्रेमाच्या या आठवड्याची सुरुवात ‘रोज डे’ ने होत असल्याने या दिवसाला खास महत्त्व आहे.

प्रेम व्यक्त करताना अनेकदा शब्द अपुरे पडतात. अशावेळी एक गुलाब आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत सहज पोहचवतो. नव्याने प्रेमात पडलेले असाल, अनेक वर्षांचे नाते असेल किंवा एखाद्या खास व्यक्तीला आपुलकी दाखवायची असेल, तर गुलाब देणे हा प्रेम व्यक्त करण्याचा सोपा आणि सुंदर मार्ग मानला जातो.

लाल गुलाब (Red Rose) : प्रेम आणि उत्कट भावनांचे प्रतीक. जोडीदार किंवा पती-पत्नीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
गुलाबी गुलाब (Pink Rose) : आदर, कृतज्ञता आणि आपुलकी दर्शवणारा गुलाब. जवळचे मित्र, कुटुंबीय किंवा खास व्यक्तीसाठी गुलाबी रंगाचा गुलाब योग्य ठरतो.
पिवळा गुलाब (Yellow Rose) : मैत्री, आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेला पिवळा रंगाचा गुलाब आपण मित्र-मैत्रिणीला देऊ शकतो.
पांढरा गुलाब (White Rose) : शुद्धता, शांतता आणि नात्याच्या नवीन सुरुवातीचे चिन्ह मानला जाणारा 'व्हाईट रोज' प्रामाणिक भावना व्यक्त करण्यासाठी योग्य ठरतो.
नारिंगी गुलाब (Orange Rose) : उत्साह, आकर्षण आणि इच्छा दर्शवणारा नारींगी गुलाब ज्यांच्याबद्दल आकर्षण वाटते त्यांच्यासाठी खास ठरतो.
लव्हेंडर गुलाब (Lavender Rose) : पहिल्याच नजरेतील प्रेम आणि जादुई भावना व्यक्त करणारा लव्हेंडर रंगाचा गुलाब 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट' साठी परफेक्ट ठरतो.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल