Mumbai : व्हॅलेंटाईन वीकची धमाल सुरुवात; ट्रॅव्हल फेस्ट, Kala Ghoda आणि बरंच काही... वाचा शहरातील टॉप फेस्टिव्हलची लिस्ट

फेब्रुवारीची सुरुवात मुंबईकरांसाठी रंग, संस्कृती आणि व्हॅलेंटाईन वीकच्या उत्साहाने गजबजलेली ठरत आहे. या विकेंडला मुंबईत विविध महोत्सव, फुलांचा बहारदार सोहळा, सेलिब्रिटींची भेट आणि कला-संस्कृतीने भरलेले कार्यक्रम अनुभवता येणार आहेत.
Mumbai :  व्हॅलेंटाईन वीकची धमाल सुरुवात; ट्रॅव्हल फेस्ट, Kala Ghoda आणि बरंच काही... वाचा शहरातील टॉप फेस्टिव्हलची लिस्ट
Published on

फेब्रुवारीची सुरुवात मुंबईकरांसाठी रंग, संस्कृती आणि व्हॅलेंटाईन वीकच्या उत्साहाने गजबजलेली ठरत आहे. उद्यापासून (दि.७) सुरु होणाऱ्या व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने या विकेंडला मुंबईत विविध महोत्सव, फुलांचा बहारदार सोहळा, सेलिब्रिटींची भेट आणि कला-संस्कृतीने भरलेले कार्यक्रम अनुभवता येणार आहेत. काहीतरी नवीन अनुभवायचं असेल, तर हा वीकेंड अगदी परफेक्ट आहे.

जिप्सी ट्रॅव्हल फेस्टिवल (Gypsy Travel Festival)

देशातील एकमेव प्रसिद्ध ‘एक्सपीरियन्शियल ट्रॅव्हल अँड कल्चर फेस्टिव्हल’ पुन्हा एकदा मुंबईत रंगणार आहे. या फेस्टिवलमध्ये डेस्टिनेशन स्टोरीटेलिंग, इमर्सिव्ह वर्कशॉप्स, ट्रॅव्हल टॉक्स, जागतिक खाद्यसंस्कृतीची मेजवानी अनुभवता येणार आहे. यंदा Amazing Thailand आणि Magical Kenya हे आंतरराष्ट्रीय शोकेस विशेष आकर्षण ठरणार आहेत.

  • कधी : ७ - ८ फेब्रुवारी २०२६

  • कुठे : जिओ वर्ल्ड ड्राईव्ह, BKC

बादशाहची सरप्राइज व्हिजिट (Badshah’s Surprise Visit At SOCIAL)

रॅपर बादशाहच्या नव्याने लाँच झालेल्या Shelter 6 Vodka ब्रँडच्या निमित्ताने मुंबईतील SOCIAL आउटलेट्समध्ये खास नाईट शो आयोजित करण्यात आला आहे. बादशाह स्वतः एका आउटलेटवर सरप्राइज व्हिजिट देण्याची आणि लाईव्ह वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे. चाहत्यांसाठी ही रात्र नक्कीच धमाल ठरणार आहे.

  • कधी : ७ फेब्रुवारी २०२६

  • कुठे : SOCIAL outlets, Mumbai

मुंबई पुष्पोत्सव (Mumbai Flower Show)

वीरमाता जिजाबाई उद्यान (राणीची बाग) येथे रंगीबेरंगी फुलांचा भव्य सोहळा पाहायला मिळणार आहे. वाद्यांच्या फुलांनी सजवलेल्या प्रतिकृती, अनोखी सजावट आणि अप्रतिम मांडणीमुळे हा पुष्पोत्सव फोटोग्राफी लव्हर्ससाठी परफेक्ट ठिकाण ठरणार आहे.

  • कधी : ६ - ८ फेब्रुवारी २०२६

  • कुठे : वीरमाता जिजाबाई उद्यान, भायखळा

पॅलेडियम ब्युटी आणि हेअर एडिट (Palladium Beauty & Hair Edit)

पॅलेडियम ब्युटी आणि हेअर एडिट हे व्हॅलेंटाईन सीझनसाठी खास संधी घेऊन आले आहेत.
याठिकाणी लक्झरी ब्युटी ब्रँड्सचे क्युरेटेड पॉप-अप्स पाहायला मिळतील. यामध्ये Lancôme, Kérastase, YSL, L’Oréal Professional या ब्रँड्सचा समावेश असणार आहे. यामध्ये प्रॉडक्ट डिस्कव्हरी आणि एक्सक्लुझिव्ह ब्युटीचा अनुभव घेता येणार आहे.

  • कधी : ६ - १५ फेब्रुवारी २०२६, सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत

  • कुठे : कोर्टयार्ड, Phoenix Palladium

काळा घोडा कला महोत्सव - शेवटचे तीन दिवस बाकी

मुंबईचा सर्वाधिक लोकप्रिय काळा घोडा कला महोत्सव आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
कला, संगीत, परफॉर्मन्सेस आणि खाद्यसंस्कृतीचा हा उत्सव अनुभवण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध आहे.

  • कधीपर्यंत : ८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत

  • कुठे : काळा घोडा, दक्षिण मुंबई

logo
marathi.freepressjournal.in