लाईफस्टाईल

गोव्याची साध्वी सतीश साईल ठरली 'मिस इंडिया वर्ल्ड २०२६'; आता 'मिस वर्ल्ड'साठी करणार भारताचे प्रतिनिधित्व

गोव्याच्या साध्वी सतीश साईलने 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६'चे विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. आता साध्वी ७५ व्या 'मिस वर्ल्ड' (जागतिक सुंदरी) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Krantee V. Kale

भुवनेश्वर : गोव्याच्या साध्वी सतीश साईलने 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६'चे विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. आता साध्वी ७५ व्या 'मिस वर्ल्ड' (जागतिक सुंदरी) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. शनिवारी रात्री भुवनेश्वर येथे एका दिमाखदार सोहळ्यात देशातील ३० स्पर्धकांमधून तिची निवड करण्यात आली.

आपल्या विजयानंतर आनंद व्यक्त करताना साध्वी म्हणाली की, हा विजय माझ्यासाठी स्वप्नवत आहे. संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी स्पर्धकांचे कौतुक करताना म्हटले की, "फेमिना मिस इंडिया हे एक असे व्यासपीठ आहे जे मुलींना जागतिक स्तरावर ओळख आणि उत्तम ग्रूमिंग मिळवून देते. आपल्या मुलींनी जगभरात यश मिळवून स्वतःला सिद्ध केले आहे.

ओदिशात प्रथमच आयोजन

विशेष म्हणजे, फेमिना मिस इंडियाची अंतिम फेरी ओदिशात आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ होती. या स्पर्धेदरम्यान ३० स्पर्धकांनी कोणार्क येथील सूर्यमंदिर आणि चंद्रभागा समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन तेथील संस्कृतीचा अनुभव घेतला.

विजेत्यांची नावे

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या राजनंदिनी पवारने 'फेमिना मिस इंडिया २०२६' (प्रथम उपविजेती) हा किताब पटकावला, तर जम्मू-काश्मीरची श्री अद्वैता जी. हिला द्वितीय उपविजेती म्हणून घोषित करण्यात आले.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय