Canva
लाईफस्टाईल

Sawan Somwar Recipe: श्रावणी सोमवारचा उपवास करताय? मग ही मखाना मलाई खीर नक्की करून बघा!

श्रावणी सोमवार हा शिव उपासनेसाठी राखलेला दिवस. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि संध्याकाळी व्रत सोडल्यानंतर काही तरी हलकं-फुलकं, पण गोड आणि पोषणमूल्य असलेलं काही तरी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी पारंपरिक चव आणि पौष्टिकता लाभलेली ‘मखाना मलाई खीर’ ही परफेक्ट रेसिपी ठरते!

Mayuri Gawade

श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, उपवास आणि सात्त्विकतेचा संगम. विशेषतः श्रावणी सोमवार, हा शिव उपासनेसाठी राखलेला दिवस. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि संध्याकाळी व्रत सोडल्यानंतर काही तरी हलकं-फुलकं, पण गोड आणि पोषणमूल्य असलेलं काही तरी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी पारंपारिक चव आणि पौष्टिकता लाभलेली ‘मखाना मलाई खीर’ ही परफेक्ट रेसिपी ठरते!

साहित्य:

  • मखाने -१ कप

  • दूध - १ लिटर

  • साखर - १/२ कप (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)

  • तूप - २ टेबलस्पून

  • वेलची पावडर - १/२ टीस्पून

  • केशर, काजू, बदाम, पिस्ता - आवडीनुसार, बारीक चिरून

कृती:

मखाने कुरकुरीत करा: एका जाड लेअरच्या पॅनमध्ये १ टेबलस्पून तूप गरम करा. त्यात मखाने घालून मंद आचेवर ५-७ मिनिटं परतून घ्या, जोपर्यंत ते खमंग व कुरकुरीत होत नाहीत. नंतर थंड झाल्यावर अर्धे मखाने मिक्सरमध्ये थोडेसे कुस्करून घ्या. काही मखाने पूर्ण ठेवले तरी चालतील.

दूध उकळा आणि घट्ट करा: दुसऱ्या पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवा. एक उकळी आली की मंद आचेवर दूध १०-१५ मिनिटं हलवून शिजवा, जेणेकरून ते थोडं घट्ट होईल.

मखाने घालून शिजवा: दूध किंचित आटल्यावर त्यात भाजलेले आणि बारीक केलेले मखाने घाला. मंद आचेवर १०-१२ मिनिटं शिजू द्या.

ड्रायफ्रुट्स आणि केशर घाला: एका छोट्या पॅनमध्ये उरलेलं १ टेबलस्पून तूप गरम करा, त्यात काजू-बदाम परतून घ्या. खीरमध्ये हे ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर आणि केशराचे धागे घालून नीट ढवळा.

साखर मिक्स करा: आता चवीनुसार साखर टाका आणि ५ मिनिटं मध्यम आचेवर शिजवा. खीर थोडी पातळ वाटू शकते, पण थंड झाल्यावर ती छान घट्ट होते.

श्रावण सोमवारच्या उपवासानंतर ही खीर केवळ तुमच्या शरीराला ऊर्जा देईल असं नाही, तर त्याच्या खमंग स्वादामुळे मनही प्रसन्न होईल. शिवभक्तीचा गोड अनुभव वाढवण्यासाठी ‘मखाना मलाई खीर’ एकदम योग्य पर्याय ठरतो.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास