Shravan Special : बाजारातील मिठाई नको, फुटाण्यांपासून घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पेढे; रेसिपी अगदी सोपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Shravan Special : बाजारातील मिठाई नको, फुटाण्यांपासून घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पेढे; रेसिपी अगदी सोपी

श्रावणातील पूजा, मंगळागौर आणि सणावारासाठी घरच्या घरी फुटाण्यांपासून बनवा मऊसूत आणि चविष्ट पेढे. खवा न वापरता कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.

Mayuri Gawade

श्रावण महिना म्हटलं की पूजा, व्रत-वैकल्यांसोबतच घरात गोडधोड पदार्थांची लगबग सुरू होते. नैवेद्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी नेहमीची मिठाई करण्याऐवजी यंदा काहीतरी वेगळं आणि झटपट करून पाहायचं असेल, तर फुटाण्यांचे पेढे हा भन्नाट पर्याय ठरू शकतो.

बाजारातून मिठाई आणण्याऐवजी घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या काही मोजक्या साहित्यापासून हे पेढे तयार करता येतात. फुटाण्यांमुळे या पेढ्यांना वेगळी चव तर मिळतेच, शिवाय ते पोटभरीचेही ठरतात. विशेष म्हणजे यासाठी खवा वापरण्याची गरज नाही. श्रावणातील पूजा, मंगळागौर, हळदी-कुंकू किंवा इतर सणांसाठी हा गोड पदार्थ नक्की करून पाहा.

फुटाण्यांचे पेढे करण्यासाठी साहित्य

  • १ कप फुटाणे

  • १ कप साखर

  • अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट

  • अर्धा कप मिल्क पावडर

  • अर्धा कप दूध

  • २ ते ३ टेबलस्पून साजूक तूप

  • २ ते ३ टेबलस्पून पिस्त्याचे काप

  • चिमूटभर वेलची पूड

  • चिमूटभर पिवळा फूड कलर

कृती :

सर्वप्रथम फुटाण्यांची सालं काढून घ्या. त्यानंतर एका कढईत किंवा तव्यावर ते मंद आचेवर हलकेच भाजून घ्या. फुटाण्यांचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्या. भाजलेले फुटाणे एका ताटात किंवा बाऊलमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.

फुटाणे थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये घ्या. त्यात साखर, डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर आणि वेलची पूड घालून बारीक वाटून घ्या. मिश्रणाची शक्य तितकी बारीक पूड करून घेतल्यास पेढ्यांचा पोत अधिक मऊ होतो.

आता हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढा. त्यात चिमूटभर पिवळा फूड कलर घालून थोडं-थोडं दूध मिसळत मळून घ्या. मिश्रण खूप पातळ होणार नाही, याची काळजी घ्या. त्यानंतर त्यात साजूक तूप घालून मिश्रण मऊसर करून घ्या.

तयार मिश्रणाचे छोटे-मध्यम आकाराचे गोळे करून त्यांना पेढ्यांचा आकार द्या. प्रत्येक पेढ्याच्या मध्यभागी पिस्त्याचे काप लावून सजवा.

श्रावणासाठी झटपट गोड पदार्थ तयार!

अशा प्रकारे फुटाण्यांपासून तयार केलेले मऊसूत आणि चविष्ट पेढे काही मिनिटांत तयार होतात. पूजा किंवा नैवेद्यासाठीच नाही, तर सणावाराला घरी आलेल्या पाहुण्यांना देण्यासाठीही हा सोपा पर्याय आहे. तयार पेढे हवाबंद डब्यात ठेवून योग्य प्रकारे साठवले, तर काही दिवस चांगले राहू शकतात.

टीप : दूध आणि इतर ताजे पदार्थ वापरले असल्याने साठवणुकीपूर्वी पेढे पूर्णपणे थंड झाले आहेत याची खात्री करा आणि खराब होण्याची चिन्हे दिसल्यास खाऊ नका.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग