होळीला रंग खेळायचाय पण त्वचा खराब होण्याची भीती वाटते? ॲलर्जीपासून बचावासाठी अशी घ्या काळजी प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
लाईफस्टाईल

होळीला रंग खेळायचाय पण त्वचा खराब होण्याची भीती वाटते? ॲलर्जीपासून बचावासाठी अशी घ्या काळजी

Skin Care Tips for Holi : ...होळीच्या रंगांपासून त्रास किंवा ॲलर्जीचा धोका कमी करण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या काही टिप्स (Skin Care Tips for Holi) दिल्या आहेत. त्वचेच्या काळजीसाठी या गोष्टी ट्राय करून पाहा.

Kkhushi Niramish

रंगांची उधळण, नृत्य आणि गाणी...लोकप्रिय सण होळी जवळ येत आहे. वसंत ऋतूच्या आगमनावर येणारा होळी हा सण आयुष्यात नवरंग घेऊन येतो. एकमेकांना रंग लावून मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. रंग खेळायला कुणाला आवडत नाही. मात्र, काही जणांना रंगांमुळे त्वचेला जळजळ होणे, रॅशेश येणे, खाज येण्यासारख्या समस्या निर्माण होतात. काही जणांना रंगांची ॲलर्जी होते. परिणामी इच्छा असूनही रंग खेळता येत नाही आणि हिरमोड होतो. तुम्हालाही अशी समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच...इथे होळीच्या रंगांपासून त्रास किंवा ॲलर्जीचा धोका कमी करण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या काही टिप्स (Skin Care Tips for Holi) दिल्या आहेत. त्वचेच्या काळजीसाठी या गोष्टी ट्राय करून पाहा.

क्लिंजरचा उपयोग

त्वचेला नीट स्वच्छ केल्यास ॲलर्जीचा धोका कमी होतो. ग्लाइकोलिक एसिडयुक्त क्लिंजर त्वचेला एक्सफोलिएट करते. यामुळे त्वचेचा रुक्षपणा कमी होतो आणि त्वचा चमकदार होते. यासाठी तुम्ही तुम्हाला योग्य वाटणाऱ्या चांगल्या प्रतिचा क्लिंजर वापरावा. यामुळे त्वचा निरोगी राहते.

एलोवेरा (कोरफड) जेल

त्वचेला मुलायम बनवण्यासाठी कोरफडचे जेल अतिशय उपयुक्त असते. यामुळे त्वचेवर रंगांमधील केमिकलमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी होते. हे जेल तुमच्या त्वचेला थंडपणा देऊन जळजळ कमी करते. बाजारात अनेक प्रकारचे कोरफडचे जेल उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही कोरफडचा गर काढून घरच्या घरी देखील तयार करू शकता. त्वचेवरील रंग काढण्यास याचा उपयोग होतो. होळीच्या आधीपासूनच कोरफडचा जेल वापरणे सुरू केल्यास अधिक फायदा होईल.

सीरम

सीरम त्वचेला चमकदार बनवण्यासाठी उपयोगी पडतात. चेहरा थंड पाण्याने धुतल्यानंतर ग्लाइकोलिक एसिडने युक्त फेस सीरमचा उपयोग तुम्हाला त्वचेच्या अॅलर्जीपासून बचाव करू शकतो.

नैसर्गिक रंग वापरणे सर्वोत्तम

होळीच्या रंगांची ॲलर्जी मुख्यत्वे करून रसायनमिश्रित रंगांमुळे होते. तसेच अनेकवेळा रंगांमध्ये काचेचा उपयोग देखील केलेला असतो. हे रंग त्वचेवर जास्त वेळ टिकतात म्हणून याच्या वापराचे प्रमाण वाढले. मात्र, यांच्या दुष्परिणामामुळे आता याविषयी जागरुकता वाढत आहे. तसेच अनेक जण नैसर्गिक रंगांनी होळी खेळण्याकडे वळले आहे. तुम्हाला जर त्वचेच्या अॅलर्जीची भीती वाटत असेल किंवा तसा त्रास असेल तर नैसर्गिक रंग वापरून होळी खेळणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. )

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश