(Photo-Yandex)
लाईफस्टाईल

नेहमीची भेंडी विसरून जा! ट्राय करा नव्या स्टाईलची मसाला भेंडी

थोडे मसाले वापरले, तर भेंडीची भाजी बनू शकते खास आणि लज्जतदार! चला जाणून घेऊया नव्या स्टाइलची मसाला भेंडी.

किशोरी घायवट-उबाळे

जेवणात भेंडीची भाजी असली की अनेकांना जेवणाचा कंटाळा येतो. साधी फोडणीची भेंडी खाऊन जिभेला काहीच नवीन वाटत नाही. पण थोडे मसाले वापरले, तर हीच भेंडी बनू शकते खास आणि लज्जतदार! चला जाणून घेऊया नव्या स्टाइलची मसाला भेंडी.

साहित्य :

  • भेंडी - २५० ग्रॅम

  • कांदा - १ मध्यम (बारीक चिरलेला)

  • तेल - ३ टेबलस्पून

  • मोहरी - अर्धा टीस्पून

  • जिरे - अर्धा टीस्पून

  • हिंग - चिमूटभर

  • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - १ टीस्पून

  • हळद - अर्धा टीस्पून

  • लाल तिखट - १ टीस्पून (चवीनुसार)

  • धणे-जिरे पूड - १ टीस्पून

  • गरम मसाला - अर्धा टीस्पून

  • आमचूर पावडर / लिंबाचा रस - १ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • कोथिंबीर - सजावटीसाठी

कृती:

भेंडी स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करा आणि लांबट कापा. बिया जास्त विखुरल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे टाका. तडतडल्यावर हिंग घाला. कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यात हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड टाकून मंद आचेवर मसाला परतावा. आता कापलेली भेंडी घालून नीट हलवा. झाकण न ठेवता मध्यम आचेवर परता. भेंडी शिजून किंचित कुरकुरीत झाल्यावर मीठ, गरम मसाला आणि आमचूर पावडर घाला. शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाका. सर्व मिक्स करून नंतर गॅस बंद करा. पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत मसाला भेंडी खूपच चविष्ट लागते.

टीप:

  • भेंडी चिकट होऊ नये यासाठी धुतल्यानंतर पूर्ण कोरडी करणे महत्त्वाचे आहे.

  • परतताना झाकण ठेवू नका, म्हणजे भेंडी कुरकुरीत राहतात.

  • आमचूर नसेल तर लिंबाचा रस शेवटी घालावा.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग