Freepik
लाईफस्टाईल

पालकाचा रस आहे फारच अद्भूत, वाढत्या वजनावर असे नियंत्रण मिळवतो की आरशात स्वतःला पाहून तुम्ही म्हणाल वा वा!

अलीकडेच काही संशोधनातून पालकाचा रस पिण्याचे अद्भूत फायदे सांगण्यात आले आहे. पालक फक्त वजन नियंत्रणात ठेवत नाही तर शरीराच्या अन्य अनेक आजारांवर ते फायदेशीर ठरते. जाणून घेऊया वजन कमी करण्यसाठी पालकाचा रस का प्यावा.

Kkhushi Niramish

वजन वाढणे ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे अनेकजण वैतागलेले आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करतात. मात्र, वजन जैसे थेच राहते. कोणकोणता आहार वजन कमी करण्यात मदत करू शकतो. यावर संपूर्ण जगभरात नित्य नवे संशोधन सुरू असते. अलीकडेच काही संशोधनातून पालकाचा रस पिण्याचे अद्भूत फायदे सांगण्यात आले आहे. पालक फक्त वजन नियंत्रणात ठेवत नाही तर शरीराच्या अन्य अनेक आजारांवर ते फायदेशीर ठरते. जाणून घेऊया वजन कमी करण्यसाठी पालकाचा रस का प्यावा.

पालकातील थायलॉकॉईड्सची जादू

पालकाच्या भाजीत थायलॉकॉईड्स नावाचे घटक असते. हा घटक जादूची कांडी फिरवल्यासारखा वजनावर परिणाम करतो. वजन वाढते तेव्हा शरीरात आतल्या आत एक वजन कमी करण्याची देखील प्रक्रिया जारी असते. ही प्रक्रिया पालकाच्या रसामुळे ४३ टक्के वाढते.

थायलाकॉईड्स काय करते?

पालकाच्या भाजीतील थायलाकॉईड्स शरीराला सारखं खात राहण्याच्या लागलेल्या विकृतीला कमी करते. पालकाच्या भाजीचे रस पिल्याने माणसाचे पोट खूप वेळ भरलेले राहते. त्यामुळे आपोआपच वजन वाढवणारे अस्वास्थकर पदार्थ खायचे टाळले जाते. त्यामुळे वजन नियंत्रणात येते. ही प्रक्रिया वेगाने घडते. त्यामुळे वजनही झटपट कमी होते.

पालकची भाजी सुपरफूड

वजन नियंत्रणात ठेवण्याव्यतिरिक्त पालकची भाजी अनेक आजरांवर गुणकारी आहे. यामुळे पालकच्या भाजीला सुपरफूड मानले जाते. पालकमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, लोह, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात.

लोह आणि कॅल्शियमचा पालकची भाजी खूप उत्तम स्रोत आहे. त्यामुळे हाडांचे दुखणे थांबते. व्हिटामिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. व्हिटामिन सी, के यामुळे त्वचेचे, केसांचे हृदयाचे आरोग्य सुधारते. पालकमधील अँटिऑक्सिडंट्स कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

आजचे राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन