नासलेलं दूध फेकू नका! स्वयंपाक आणि स्किनकेअर दोन्हीसाठी फायदेशीर, जाणून घ्या त्याचे वेगवेगळे उपयोग 
लाईफस्टाईल

नासलेलं दूध फेकू नका! स्वयंपाक आणि स्किनकेअर दोन्हीसाठी फायदेशीर, जाणून घ्या त्याचे वेगवेगळे उपयोग

घरात दूध नासलं की बहुतेक जण पहिली प्रतिक्रिया देतात - "अरेरे, सगळं वाया गेलं!" मग पटकन त्याचं पनीर करून टाकलं जातं. पण खरं सांगायचं तर नासलेलं किंवा फाटलेलं दूध अजिबात वाया जाण्यासारखं नसतं. योग्य पद्धतीने वापर केला तर ते स्वयंपाक, सौंदर्य आणि घरगुती कामांसाठीही खूप उपयोगी ठरू शकतं.

Mayuri Gawade

घरात दूध नासलं की बहुतेक जण पहिली प्रतिक्रिया देतात - "अरेरे, सगळं वाया गेलं!" मग पटकन त्याचं पनीर करून टाकलं जातं. पण खरं सांगायचं तर नासलेलं किंवा फाटलेलं दूध अजिबात वाया जाण्यासारखं नसतं. योग्य पद्धतीने वापर केला तर ते स्वयंपाक, सौंदर्य आणि घरगुती कामांसाठीही खूप उपयोगी ठरू शकतं.

पनीर बनवणं हा त्याचा एक उपयोग आहे. त्याशिवायही फाटलेल्या दुधापासून अनेक गोष्टी करता येतात. पुढच्या वेळी दूध नासलं तर ते सिंकमध्ये ओतण्याऐवजी हे सोपे उपाय करून पाहा.

बेकिंगसाठी उपयोगी

केक, पॅनकेक्स किंवा मफिन्स बनवताना साध्या पाण्याऐवजी फाटलेल्या दुधाचा वापर केल्यास पदार्थ अधिक मऊ आणि स्पंजी होतात.

कणिक मळण्यासाठी

दूध फाटल्यानंतर जे पाणी उरते त्याला व्हे म्हणतात. त्याने कणिक मळल्यास चपाती किंवा पराठे अधिक मऊ होतात आणि चवही छान लागते.

भाजी किंवा आमटीच्या ग्रेव्हीत

रस्सा भाजी किंवा आमटी बनवताना थोडं फाटलेल्या दुधाचं पाणी घातलं तर ग्रेव्हीला दाटपणा येतो आणि चव वाढते.

भात किंवा पुलाव शिजवताना

पाण्याऐवजी हे पाणी वापरल्यास भात अधिक मऊ आणि सुटसुटीत होतो.

डिप्स आणि सॅलड ड्रेसिंग

थोडं मीठ, मिरी, लसूण आणि हर्ब्स घालून फेटल्यास यापासून चविष्ट डिप किंवा सॅलड ड्रेसिंग तयार होऊ शकतं.

सूपमध्ये वापर

सूप बनवताना थोडं हे पाणी घातल्यास सूपला दाटपणा आणि पौष्टिकता मिळते.

त्वचेसाठी नैसर्गिक उपाय

फाटलेल्या दुधात लॅक्टिक अ‍ॅसिड असतं. बेसन किंवा मध मिसळून फेसपॅक केल्यास त्वचा मऊ आणि स्वच्छ दिसू शकते.

केसांसाठी कंडिशनर

नासलेल्या दुधाचं पाणी केसांना लावून काही वेळाने धुतल्यास केस मऊ आणि चमकदार दिसू शकतात.

झाडांसाठी खत

पाण्यात मिसळून रोपांना दिल्यास मातीला पोषण मिळते आणि झाडांची वाढ चांगली होते.

थोडक्यात, दूध नासलं म्हणजे ते वाया गेलं असं नाही. पनीर करण्याव्यतिरिक्तही त्याचे अनेक उपयोग आहेत. थोडी कल्पकता वापरली तर स्वयंपाकापासून स्किनकेअरपर्यंत त्याचा फायदा घेता येतो.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण