Summer Tips : पाणी पिऊनही सतत थकवा येतोय? डिहायड्रेशनची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Summer Tips : पाणी पिऊनही सतत थकवा येतोय? डिहायड्रेशनची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा

पुरेशी झोप घेतल्यानंतरही सतत थकल्यासारखं वाटत असेल, तर ते डिहायड्रेशनचं लक्षण असू शकतं. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा मंदावतो.

किशोरी घायवट-उबाळे

देशभरात उष्णतेची तीव्र लाट सुरु असताना शरीर हायड्रेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशनच्या तक्रारींमध्येही वाढ होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे. केवळ तहान लागणं हेच डिहायड्रेशनचं लक्षण नसून, पुरेसं पाणी पिऊनही शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते.

पोषणतज्ज्ञ शिल्पा अरोरा यांच्या मते, "शरीरातून जितके द्रव बाहेर पडतात त्यापेक्षा कमी प्रमाणात द्रव घेतल्यास शरीरातील मिनरल्सचा समतोल बिघडतो आणि डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते." विशेषतः उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातून पाणी आणि आवश्यक क्षार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात.

डिहायड्रेशनची 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

सतत थकवा जाणवणे

पुरेशी झोप घेतल्यानंतरही सतत थकल्यासारखं वाटत असेल, तर ते डिहायड्रेशनचं लक्षण असू शकतं. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा मंदावतो.

वारंवार डोकेदुखी होणे

उन्हाळ्यात वारंवार डोकेदुखी होत असल्यास शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याचं संकेत असू शकतात. द्रव संतुलन बिघडल्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो.

गडद पिवळ्या रंगाची लघवी

लघवीचा रंग गडद पिवळा दिसत असल्यास शरीर पाणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. हे डिहायड्रेशनचं स्पष्ट लक्षण मानलं जातं.

लक्ष केंद्रित करण्यात अडचण

कामात लक्ष न लागणे, मानसिक थकवा जाणवणे हेही शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

पाणी पिऊनही तहान जाणवणे

सतत पाणी पिऊनही शरीर डिहायड्रेट वाटत असेल, तर इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता कारणीभूत असू शकते. घामामुळे शरीरातील सोडियम आणि इतर क्षार कमी होतात.

उष्णतेच्या लाटेत डिहायड्रेशनचा धोका का वाढतो?

अत्यंत उष्ण वातावरणात शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात घाम सोडतं. त्यामुळे शरीरातील पाणी आणि मिनरल्स झपाट्याने कमी होतात. वेळेत काळजी न घेतल्यास चक्कर येणे, अशक्तपणा आणि किडनीवरही परिणाम होऊ शकतो.

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काय कराल?

तज्ज्ञांच्या मते, केवळ पाणी पिणं पुरेसं नसून आहारात पाण्याने समृद्ध पदार्थांचा समावेश करणंही आवश्यक आहे.

  • काकडी

  • टोमॅटो

  • टरबूज आणि खरबूज

  • संत्री

  • द्राक्षे

  • नारळपाणी आणि ORS

याशिवाय, कोल्ड ड्रिंक्स आणि गॅसयुक्त पेयं किंवा कार्बोनेटेड पेयांचं अतिसेवन टाळण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. कारण अशी पेयं शरीरातील पाण्याची कमतरता आणखी वाढवू शकतात.

माल पोहोचल्याची आता डिजिटल नोंद; ई-वे बिल पोर्टलवर सुविधा सुरू

पारलेने 'मेलोडी'चे उत्पादन वाढविले...पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या 'चाॅकलेट भेटी'नंतर मागणीत वाढ

...तर पॅरोल नाकारणे घटनाबाह्य! मुंबई उच्च न्यायालयाचा कैद्यांच्या हक्कासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाची घोषणा

Pune : नसरापूर अत्याचारप्रकरणी २८ मे रोजी दोषारोप ठेवणार