Sunday Special: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल 'खीमा पॅटिस'; पाहुणेही करतील कौतुक 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Sunday Special: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल 'खीमा पॅटिस'; पाहुणेही करतील कौतुक

नेहमीचे स्नॅक्स खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी ट्राय करा खमंग आणि कुरकुरीत 'खीमा पॅटिस'.

किशोरी घायवट-उबाळे

संडे म्हटलं की घरात काहीतरी खास आणि चविष्ट बनवण्याचा बेत ठरलेलाच असतो. नेहमीचे स्नॅक्स खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी ट्राय करा खमंग आणि कुरकुरीत 'खीमा पॅटिस'. मसालेदार मटण खीमा, बाहेरून क्रिस्पी कव्हर आणि आतून रसाळ चव यामुळे ही डिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. संध्याकाळच्या चहासोबत किंवा पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणूनही ही रेसिपी परफेक्ट ठरते.

साहित्य :

  • ३०० ग्रॅम शिजवलेला मटण खीमा

  • दीड कप ब्रेडक्रम्ब्स

  • २ अंडी

  • ३ छोटे कांदे (बारीक चिरलेले)

  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर

  • १ टीस्पून लाल तिखट

  • १ टीस्पून ठेचलेला लसूण

  • अर्धा टीस्पून हळद

  • १ टीस्पून गरम मसाला

  • १ टीस्पून जिरेपूड

  • १ टीस्पून धणेपूड

  • २ टेबलस्पून कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • तेल (शॅलो फ्रायसाठी)

कृती :

सर्वप्रथम कुकरमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, हळद आणि मटण खीमा घालून ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. खीमा थंड झाल्यावर एका मोठ्या भांड्यात काढा. त्यात कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.

आता त्यात लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, मीठ आणि कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण एकजीव करा. तयार मिश्रणाचे समान आकाराचे पॅटिस तयार करा.

एका बाऊलमध्ये अंडी फेटून घ्या. तयार पॅटिस आधी अंड्यात बुडवा आणि नंतर ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा. तवा गरम करून त्यावर थोडे तेल घाला. तयार पॅटिस दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा. गरमागरम खीमा पॅटिस हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

टिप्स :

  • पॅटिस अधिक कुरकुरीत हवे असतील तर डबल कोटिंग करा.

  • खीमा पूर्णपणे कोरडा असावा, नाहीतर पॅटिस तुटू शकतात.

  • अधिक स्पायसी फ्लेवरसाठी काळी मिरी किंवा चाट मसाला वापरू शकता.

  • एअर फ्रायरमध्येही हे पॅटिस कमी तेलात तयार करता येतात.

दरवाढीचा तिसरा दणका; पेट्रोल, डिझेल, CNG पुन्हा महाग, दहा दिवसांत तब्बल ५ रुपयांनी महागले

आजचे राशिभविष्य, २४ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

व्हाईट की पिंक? कोणतं ड्रॅगन फ्रूट आरोग्यासाठी जास्त फायदेशीर; जाणून घ्या फरक

पिंपल्समुळे वैतागलात? सकाळी रिकाम्या पोटी करा 'हा' घरगुती उपाय; त्वचा दिसेल क्लिअर

गोल्डन साडी, गजरा अन् पारंपरिक दागिने; करिश्मा तन्नाच्या डोहाळे जेवणाची सोशल मीडियावर चर्चा