(Photo-@kalimirchbysmita)
लाईफस्टाईल

Sunday Special Recipe : घरीच बनवा मसालेदार स्टफ्ड पापलेट फ्राय; पाहुण्यांसाठी परफेक्ट डिश, वाचा रेसिपी

मसालेदार स्टफिंग, कुरकुरीत कोटिंग आणि पापलेटची चव यामुळे ही डिश घरच्यांना नक्कीच आवडेल. घरच्या घरी झणझणीत स्टफ्ड पापलेट फ्राय कसा बनवायचा, चला जाणून घेऊया.

किशोरी घायवट-उबाळे

रविवार म्हणजे कुटुंबासोबत खास जेवणाचा आनंद घेण्याचा दिवस. नॉनव्हेज प्रेमींसाठी या दिवशी काहीतरी खास आणि चविष्ट बनवण्याची इच्छा असते. अशावेळी 'स्टफ्ड पापलेट फ्राय' हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मसालेदार स्टफिंग, कुरकुरीत कोटिंग आणि पापलेटची चव यामुळे ही डिश घरच्यांना नक्कीच आवडेल. घरच्या घरी झणझणीत (Stuffed) स्टफ्ड पापलेट फ्राय कसा बनवायचा, चला जाणून घेऊया.

साहित्य :

पापलेटसाठी

  • २ मध्यम पापलेट (स्वच्छ करून काटे काढलेले)

  • चवीनुसार मीठ

  • अर्धा टीस्पून हळद

  • २ टीस्पून लिंबाचा रस

  • शॅलो फ्रायसाठी तेल

स्टफिंगसाठी

  • दीड टेबलस्पून तेल

  • १ टीस्पून जिरे

  • २ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)

  • १५ ते २० कढीपत्ता (चिरलेला)

  • १ टीस्पून ठेचलेले आलं-लसूण

  • २ लहान कांदे (चिरलेले)

  • २ लहान टोमॅटो (चिरलेले)

  • चवीनुसार मीठ

  • १ टीस्पून लाल तिखट

  • १ टीस्पून काश्मीरी लाल तिखट

  • अर्धा टीस्पून हळद

  • १ टीस्पून धणेपूड

  • अर्धा टीस्पून ठेचलेली काळी मिरी

  • ३ ते ४ कोकम पाकळ्या

  • १ टेबलस्पून पुदिन्याची पाने

  • २ टेबलस्पून कोथिंबीर

कोटिंगसाठी

  • १ कप तांदळाचे पीठ

  • अर्धा कप रवा

  • १ टीस्पून काश्मीरी लाल तिखट

  • १ टेबलस्पून कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

सर्व्ह करण्यासाठी

  • कांद्याच्या चकत्या

  • लिंबाचे तुकडे

  • हिरवी चटणी

कृती :

सर्वप्रथम पापलेट स्वच्छ धुऊन त्यावर मीठ, हळद आणि लिंबाचा रस लावून १० ते १५ मिनिटे मुरवून ठेवा.

स्टफिंग तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि आलं-लसूण घालून परता. त्यानंतर कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परता. आता त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर मीठ, लाल तिखट, काश्मीरी तिखट, हळद, धणेपूड, काळी मिरी, कोकम, पुदिना आणि कोथिंबीर घालून चांगले परता. थोडे पाणी घालून २ ते ३ मिनिटे शिजवा आणि मिश्रण थंड होऊ द्या.

त्यानंतर प्रत्येक पापलेटमध्ये तयार स्टफिंग भरून घ्या. एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ, रवा, तिखट, मीठ आणि कोथिंबीर मिक्स करा आणि त्यात पापलेट सर्व बाजूंनी कोट करा. कढईत तेल गरम करून पापलेट दोन्ही बाजूंनी कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा. गरमागरम स्टफ्ड पापलेट कांदा, लिंबू आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • पापलेट ताजे असल्यास चव अधिक उत्तम लागते.

  • तांदळाचे पीठ आणि रवा घातल्यामुळे मासा अधिक कुरकुरीत बनतो.

  • मसाला थोडा तिखट हवा असल्यास हिरव्या मिरच्या किंवा तिखट वाढवू शकता.

  • मासा जास्त वेळ तळू नका, नाहीतर तो कडक होऊ शकतो.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती