झोप ही आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एक परिपूर्ण झोपेसाठी हल्ली खूप नवीन नवीन मार्ग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. सोशल मीडिया व्हिडिओत अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोक झोप येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गॅझेट्स, स्लीप-ट्रॅकर्स किंवा चांगली झोप येण्यासाठी आहार नियमन देखील करतात. तुम्ही देखील अशाच प्रकारे काही गोष्टी करत आहात का? मग तुम्हीही Sleepmaxxing ट्रेंडकडे वाटचाल करत आहात. मात्र, इथे मुख्य मुद्दा असा आहे की परिपूर्ण झोप आवश्यक असली तरी ती नैसर्गिकरित्या येणे महत्त्वाचे आहे का अशा प्रकारे गॅझेट्स किंवा अन्य उपायांनी झोप परिपूर्ण करायला हवी. नेमके काय आहे या व्हायरल ट्रेंडचे फायदे आणि दुष्परिणाम चला जाणून घेऊ या...
Sleepmaxxing म्हणजे काय?
या ट्रेंडमध्ये फक्त ७-८ तास झोप घेणे महत्त्वाचे नाही तर ही झोप सर्वोत्तम आणि परिपूर्ण असायला हवी. यासाठी लोक स्लीप ट्रकिंग, बायोहॅकिंग विशेष आहार, महागडे गादे, निळा प्रकाश रोखणारे चष्मे आणि इतर अनेक साधनांचा वापर देखील त्यात समाविष्ट आहे. फक्त झोपणेच नाही तर "परिपूर्ण" पद्धतीने झोपणे हे या ट्रेंडचे उद्दिष्ट आहे. इतकेच काय तर लोक झोपण्याच्या पोझिशन्सवरही प्रयोग करत आहेत. सोशल मीडियावर लोक Sleepmaxxing चे त्यांच्या प्रयोगाचे व्हिडिओ शेअर करत असतात.
Sleepmaxxing चे फायदे
चांगली झोप = चांगले आरोग्य
चांगल्या दर्जाची झोप रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मेंदूचे कार्य आणि उर्जेची पातळी वाढविण्यास मदत करते. झोपेतून उठल्यावर ताजेतवाने वाटते.
मानसिक आरोग्य सुधारते
चांगली झोप ताण आणि चिंता कमी करते, ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.
लक्ष केंद्रित करणे वाढते
जे लोक योग्य झोप घेतात ते अधिक लक्ष केंद्रित करू शकतात आणि उत्साही असतात.
Sleepmaxxing चे तोटे
Sleepmaxxing चे अनेक असले तरी, परिपूर्ण झोपेचे वेड जास्त चिंता आणि ताण निर्माण करू लागल्यास ते हानिकारक देखील ठरू शकते.
आपली झोप परिपूर्ण झाली आहे का नाही यासाठी काही लोक झोपेचे ट्रॅकिंग करताना अतिरिक्त काळजी करतात. त्यामुळे त्यांना आपली झोप परिपूर्ण होत नाही आहे, अशी चिंता होऊ शकते.
झोपण्यासाठी महागड्या उत्पादनांवर खर्च
काही जण उत्तम झोपेसाठी महागड्या तंत्रज्ञानाच्या गाद्या, उच्च तंत्रज्ञानाचे स्लीप ट्रॅकर्स वापरतात. परिणामी आर्थिकदृष्ट्या ते फारसे परवडणारे नसते. परिणामी त्यांना खर्चाचा मानसिक त्रास सहन करावा लागतो.
झोपेवर नियंत्रण ठेवण्याचे वेड
झोपेबद्दल जास्त विचार करू लागता तेव्हा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि ती व्यक्ती अतिविचार आणि निद्रानाशाची शिकार होऊ शकते.
Sleepmaxxing ट्रेंड फॉलो करावा की करू नये?
मुळात ज्या लोकांना झोप न येण्याचा त्रास आहे. त्या लोकांनी Sleepmaxxing ट्रेंड काही दिवसांसाठी फॉलो केल्यास त्यांना छान झोप येऊ शकते.
Sleepmaxxing ट्रेंड फॉलो करताना तो निरोगी पद्धतीने करावा. अर्थात यासाठी फार महागड्या गाद्या, स्मार्ट उशा वापरण्याची गरज नाही. याऊलट आहे त्या परिस्थितीत तुम्हाला चांगली झोप कशी लागू शकते यावर लक्ष देणे जास्त उत्तम आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)