Freepik
लाईफस्टाईल

Vaastu Tips : घरात शंख असणे चांगले, पण दोन शंख एकत्र ठेवल्यास...

शंखाचा संबंध भगवान विष्णूंशी जोडला गेला आहे. तसेच देवघरात शंख ठेवून त्यांची पूजा केली जाते. प्रत्येकाच्या देवघरात शंख असतोच असतो. घरात शंख ठेवणे त्याची पूजा करणे हे उत्तम असते. पण शंख किती ठेवावे याचे काही नियम आहेत. चला जाणून घेऊया शंख ठेवण्याची योग्य पद्धत काय का करतात शंखाची पूजा...

Kkhushi Niramish

तुम्ही अनेक धार्मिक मालिकांमध्ये पाहिले असेल अनेक शुभ कामांची सुरुवात शंखनादाने केली जाते. विजय झाल्यास शंख फुंकून केली जाते. कारण हिंदू धर्मात शंखाला खूप पवित्र मानले गेले आहे. शंखाचा संबंध भगवान विष्णूंशी जोडला गेला आहे. तसेच देवघरात शंख ठेवून त्यांची पूजा केली जाते. प्रत्येकाच्या देवघरात शंख असतोच असतो. घरात शंख ठेवणे त्याची पूजा करणे हे उत्तम असते. पण शंख किती ठेवावे याचे काही नियम आहेत. चला जाणून घेऊया शंख ठेवण्याची योग्य पद्धत काय का करतात शंखाची पूजा...

शंख का फुंकतात?

शंख फुंकण्याचे अनेक फायदे आहेत. धार्मिक मान्यतेनुसार शंख फुंकल्याने त्यातील ध्वनीलहरी सभोवतालचे वातावरण शुद्ध होते. शंखातून निघणाऱ्या ध्वनीलहरींमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. याशिवाय संपूर्ण घरात नवीन ऊर्जा संचारते. शंख हा ओम ध्वनी आणि विश्वाचे प्रतिनिधीत्व करतो, अशी धार्मिक मान्यता आहे. हा विश्वातील ऊर्जा प्रवाहाशी संबंधित आहे.

घरात शंख कोणत्या ठिकाणी ठेवावा?

वास्तुशास्त्रात शंख घरात ठेवण्याचे काही नियम आहेत. शंख हे भौतिक समृद्धीचे प्रतिक आहे. त्यामुळे तुम्हाला घरात समृद्धी हवी असेल तर शंख योग्य ठिकाणी ठेवायला हवा. वास्तुशास्त्र सांगते शंख हा देवघरात किंवा अन्य कोणत्याही पवित्र ठिकाणी ठेवावा. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. ईशान्य दिशेत शंख ठेवणे देखील शुभ मानले जाते. कारण ईशान्य दिशा ही पूजा साहित्य ठेवण्यासाठी शुभ मानली जाते. यामुळे घरात सकारात्मक लहरी वाढतात.

दोन शंख ठेवणे योग्य असते का?

अनेक जण एक शंख पूजेसाठी तर दुसरा शंख फुंकण्यासाठी वापरतात. कारण जो शंख तोंडाने फुंकतो त्याची पूजा केली जात नाही. अशी अनेकांची मान्यता असते. म्हणून अनेक जण दोन शंख घरात ठेवतात. मात्र, दोन शंख घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा संचारू शकते.

वास्तुशास्त्रानुसार शंख हा ऊर्जा लहरींचा मोठा स्रोत असतो. त्यामुळे दोन शंख जवळ जवळ असतील तर त्यातून निघणाऱ्या शक्तिशाली ऊर्जा लहरी एकमेकांवर आदळून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. यामुळे घरात सातत्याने कलह निर्माण होतात. त्यामुळे दोन शंख ठेवत असाल तर शंख एकमेकांपासून लांब ठेवणे योग्य असते.

शंखाबाबत या आणखी काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा

  • शंख शिवपूजेसाठी वापरू नये.

  • शंखाने भगवान विष्णूनां जलाभिषेक करावा किंवा स्नान घालावे.

  • शंख देवघरात पूजेच्या ठिकाणी ठेवल्यास स्नान केल्यानंतरच तिथे स्पर्श करावा.

  • शंख घराच्या दक्षिण दिशेत कधीही ठेवू नये.

  • शंख जमिनीवर ठेवू नये यामुळे शंखाचा अपमान होतो.

  • फुंकण्यासाठी शंखाचा वापर केल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून ठेवावा.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

आपटा रेल्वे स्थानक बॉलिवूडचे ‘फेव्हरेट’ डेस्टिनेशन; सीएसएमटीनंतर सर्वाधिक पसंती; मध्य रेल्वेला ८५ लाखांचा महसूल

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर होणार कारवाई; दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना

पास विद्यार्थांपेक्षा जागा अधिक; अकरावीसाठी मुंबईत ४ लाख ७६ हजार जागा, ठाण्यात १ लाख ६० हजार जागा उपलब्ध

भाडेकरुने घरमालकाची शांतता भंग करणे हा ‘उपद्रव’; HC चे महत्त्वपूर्ण निरीक्षण, पुण्याच्या बुधवार पेठेत लॉज चालवणाऱ्याला दणका

मुलाच्या आयुष्यात आई-वडील दोघेही महत्त्वाचे; उच्च न्यायालयाचा निर्वाळा; याचिकाकर्त्या महिलेला झटका