लाईफस्टाईल

Valentine's Week : Teddy Dayचा इतिहास काय? 'टेडी' नाव पडलं तरी कसं? जाणून घ्या महत्त्व

अनेकदा भावना शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, तेव्हा टेडी गिफ्ट करून आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवल्या जातात.

किशोरी घायवट-उबाळे

व्हॅलेंटाईन वीकमध्ये दररोज प्रेम व्यक्त करण्याचा एक खास दिवस असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘टेडी डे’. दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा टेडी डे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचं प्रतीक मानला जातो.

‘टेडी डे’ का साजरा केला जातो?

टेडी बेअर हे निरागस प्रेम, सुरक्षितता आणि भावनिक आधाराचं प्रतीक आहे. अनेकदा भावना शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, तेव्हा टेडी गिफ्ट करून आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. विशेषतः लाँग-डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये टेडी हा जवळीक आणि आठवणींचा आधार ठरतो.

‘टेडी डे’चा इतिहास काय आहे?

टेडी बेअरचा इतिहास अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट यांच्याशी जोडलेला आहे. १४ नोव्हेंबर १९०२ रोजी मिसिसिपीमधील अस्वलाच्या शिकारीच्या सहलीत, राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी शिकारीच्या सहाय्यकांनी बांधून ठेवलेल्या एका काळ्या अस्वलाला गोळी मारण्यास नकार दिला. या घटनेवर आधारित वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले.

या व्यंगचित्राने प्रेरित होऊन, ब्रुकलिनमधील कँडी स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम यांनी एका मऊ अस्वलाच्या खेळण्याला 'टेडीज बेअर' (Teddy’s Bear) असे नाव दिले. थियोडोर रूझवेल्ट यांचे टोपणनाव 'टेडी' होते. या खेळण्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि पुढे जाऊन ते 'टेडी बेअर' म्हणून जगभर प्रसिद्ध झाले.

आजच्या काळातील 'टेडी डे'चं महत्त्व

आज टेडी डे केवळ गिफ्ट देण्यापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो भावना व्यक्त करण्याचा एक खास दिवस बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये टेडी बेअर लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर Teddy Day Wishes, फोटो आणि खास मेसेज शेअर करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

टेडी डे कसा साजरा करावा?

आपल्या प्रिय व्यक्तीला त्यांच्या आवडीचा टेडी गिफ्ट देणे, त्यासोबत खास मेसेज लिहिणे किंवा एखादा छोटा सरप्राइज प्लॅन करणे हे टेडी डे साजरा करण्याचे लोकप्रिय मार्ग आहेत.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके