लाईफस्टाईल

Valentine’s Gift Idea: गुलाब-चॉकलेट्स विसरा! वाचा Valentine’s Day साठी खास गिफ्ट आयडियाज

प्रेम व्यक्त करण्यासाठी महागडं गिफ्ट असायलाच हवं असं नाही, पण ते मनापासून आणि हटके असणं नक्कीच महत्त्वाचं आहे.

किशोरी घायवट-उबाळे

'व्हॅलेंटाईन डे' म्हटलं की गुलाब, चॉकलेट्स आणि कार्ड्स हे ठरलेलंच. पण दरवर्षी तेच तेच गिफ्ट्स दिल्यामुळे या दिवसाचं खासपण हळूहळू कमी होत चाललंय. प्रेम व्यक्त करण्यासाठी महागडं गिफ्ट असायलाच हवं असं नाही, पण ते मनापासून आणि हटके असणं नक्कीच महत्त्वाचं आहे.

यंदा तुमच्या जोडीदाराला खरंच स्पेशल फील द्यायचा असेल, तर ट्रेंडपेक्षा वेगळ्या आणि आठवणीत राहणाऱ्या गिफ्ट्सचा विचार करा. चला तर मग पाहूया व्हॅलेंटाईन डे साठी खास आणि हटके गिफ्ट आयडियाज, ज्या तुमचं प्रेम अधिक खास बनवतील.

'व्हॅलेंटाईन डे' साठी हटके गिफ्ट आयडियाज

1. स्क्रॅपबुक

तुमच्या नात्याच्या प्रवासातील फोटो, लेटर्स, आठवणी एकत्र करून बनवलेलं स्क्रॅपबुक-हे गिफ्ट शब्दांपेक्षा जास्त भावना व्यक्त करतं.

2. कपल पोर्ट्रेट किंवा डिजिटल इलुस्ट्रेशन

तुमच्या दोघांचा फोटो वापरून बनवलेलं कस्टम आर्टवर्क किंवा चित्र घरात शोभून दिसेल आणि कायमची आठवण ठरेल.

3. Experience Gift - आठवणींची भेट

डिनर डेटपेक्षा काहीतरी वेगळं-जसं की जवळची ट्रिप, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी किंवा वर्कशॉप. अशा अनुभवांची आठवण आयुष्यभर राहते.

4. हॅन्डरिटन लव्ह लेटर जार

मोबाईलच्या मेसेजपेक्षा स्वतः लिहिलेल्या पत्रांची मजा काही वेगळीच. रोज एक पत्र वाचण्याचा आनंद जोडीदाराला खास वाटेल.

5. कस्टमाइज परफ्युम किंवा कँडल

जोडीदाराच्या आवडीनुसार तयार केलेला परफ्युम किंवा सुगंधी मेणबत्ती-प्रेमाची एक वेगळी ओळख ठरू शकेल.

गिफ्ट निवडताना लक्षात ठेवा

  • किंमत नाही, भावना महत्त्वाची

  • जोडीदाराच्या आवडी-निवडी लक्षात घ्या

  • युनिक आणि पर्सनल टच असणारे गिफ्ट द्या

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके