मार्च आणि एप्रिल या कडक उन्हाळ्याच्या महिन्यात तापमान जास्त असते. यामुळे अनेक पीक या तापमानात पाण्याच्या कमतरतेमळे असो किंवा उष्णतेच्या तीव्रतेमुळे उगवत नाहीत. या दोन महिन्यात पुढे दिलेली पाच पिके तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावू शकता आणि चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊन मोठा नफा कमवू शकता.
वांगे
वांग्याची वाढ होण्यासाठी १३ ते २१ अंश तापमान पुरेसे आहे. रात्रीचे तापमान वांग्याच्या पिकाला फायदेशीर असते त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात वांग्याचे पीक घेणे योग्य ठरू शकेल.
कोथिंबीर
शेतकरी मार्च आणि एप्रिल महिन्यात कोथिंबीरची लागवड करू शकतात. कोथिंबीर २० ते ३० अंश तापमानात वाढते त्यामुळे या महिन्यात कोथिंबीरचे उत्पादन चांगले निघते.
कांदा
१० ते ३२ अंश तापमानात कांदा सहज वाढू शकतो तसेच १५० ते १६० दिवसात कांद्याचे उत्पन्न निघते यामुळे या दोन महिन्यात कांद्याचे पीक लावणे फायदेशीर आहे.
भेंडी
मार्च एप्रिल महिन्यात भेंडीसाठी पूरक वातावरण असते. त्यामुळे शेतामध्ये भेंडीची लागवड करून भरपूर नफा मिळवू शकता.
काकडी
शेतकऱ्यांना कमी वेळेत जास्त फायदा मिळवून देणारे पिक म्हणजे काकडी. उन्हाळ्यात काकडीची मागणी जास्त असते. काकडीचे पीक या दोन महिन्यात उत्कृष्ट प्रकारे उगवते व काकडीला मागणी देखील भरपूर प्रमाणात असते. यामुळे मार्च आणि एप्रिल मध्ये काकडीची लागवड फायदेशीर आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे)