लाईफस्टाईल

Winter Special : लिप बामपासून परफ्यूम टिकवण्यापर्यंत...हिवाळ्यातील छोटीशी पण जादूई गोष्ट - पेट्रोलियम जेली

हिवाळा आला की त्वचेचा कोरडेपणा, ओठांचा रापलेला पोत आणि चेहऱ्याची निस्तेज चमक ही समस्या कायमच भेडसावते. अशा वेळी एक साधीशी पण प्रभावी गोष्ट मदतीला धावून येते ती म्हणजे 'पेट्रोलियम जेली!'

नेहा जाधव - तांबे

हिवाळा आला की त्वचेचा कोरडेपणा, ओठांचा रापलेला पोत आणि चेहऱ्याची निस्तेज चमक ही समस्या कायमच भेडसावते. अशा वेळी एक साधीशी पण प्रभावी गोष्ट मदतीला धावून येते ती म्हणजे 'पेट्रोलियम जेली!' बर्‍याच जणींच्या ड्रेसिंग टेबलवर कायम दिसणारी ही छोटीशी जार फक्त त्वचा मऊ ठेवण्यासाठीच नाही, तर तिचे अनेक भन्नाट उपयोग आहेत.

त्वचेला स्निग्धता आणि तरुणपणा

पेट्रोलियम जेली त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते. नियमित वापर केल्यास त्वचा अधिक टवटवीत दिसते.

लिप बाम म्हणून उत्तम पर्याय

हिवाळ्यात ओठ कोरडे होणे ही सर्वात सामान्य समस्या. अशावेळी महागडे लिप बाम न वापरता थोडीशी पेट्रोलियम जेली ओठांवर लावल्यास त्यांना हायड्रेशन मिळते आणि नरमपणा टिकून राहतो.

नैसर्गिक ग्लो साठी

चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसत असेल, तर मेकअपच्या आधी किंवा नंतर हलकीशी जेली वापरल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. ती त्वचेला एक सुंदर डेवी फिनिश देते.

मेकअप आणि कलर स्टेन रिमूव्हर

मेकअप काढताना मेकअप रिमूव्हर नसेल तर पेट्रोलियम जेली एक उत्तम पर्याय ठरतो.
तसेच केस रंगवताना हेअरलाइनवर जेली लावल्यास रंग त्वचेला चिकटत नाही.

परफ्यूम टिकवण्यासाठी गुपित

परफ्यूम मारण्यापूर्वी त्या ठिकाणी थोडीशी पेट्रोलियम जेली लावल्यास सुगंध जास्त काळ टिकतो. हा ट्रिक तुम्ही पुढच्या पार्टीत नक्की वापरून बघा!

आफ्टर शेव्ह लोशन

शेविंगनंतर त्वचा कोरडी आणि संवेदनशील होते. अशा वेळी पेट्रोलियम जेलीचा हलका थर लावल्यास त्वचेला आराम मिळतो आणि इरिटेशन कमी होते.

एक छोटीशी टिप

  • जेलीचा वापर नेहमी स्वच्छ हातांनी करा आणि जास्त प्रमाणात न वापरता फक्त आवश्यक तेवढाच वापरा.

हिवाळ्याचा कोरडेपणा दूर करून त्वचेला नरम, चमकदार आणि तजेलदार ठेवण्यासाठी ही पेट्रोलियम जेली तुमची सर्वात विश्वासू ब्यूटी साथीदार ठरू शकते!

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क न घेण्याच्या राज्य मंडळाच्या सूचना

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल