रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

'कुमकुम भाग्य' आणि 'वागले की दुनिया' फेम अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिची शेवटची इन्स्टाग्राम रील सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
Published on

'कुमकुम भाग्य' आणि 'वागळे की दुनिया' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अवघ्या २२ व्या वर्षी तिने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरात राहणारी संचिता १४ जून रोजी आपल्या घरी मृतावस्थेत आढळली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शेवटच्या रीलमध्ये आनंदात दिसली

आत्महत्येपूर्वी संचिता उगलेने इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती. या व्हिडिओमध्ये ती 'डफलीवाले डफली बजा' या गाण्यावर आनंदात नाचताना दिसत होती. चेहऱ्यावर हसू आणि उत्साह असलेल्या या रीलनंतर काही तासांतच तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने चाहते हादरले आहेत. तिची ही रील आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

कमेंट्समध्ये चाहते तिच्याबद्दलच्या आठवणी सांगत तिच्या उत्साही आणि आनंदी व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

नालासोपाऱ्यातील राहत्या घरी आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जूनच्या संध्याकाळी संचिता तिच्या खोलीत साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. खोली आतून बंद होती. कुटुंबीयांनी तातडीने तिला वसई-विरार महानगरपालिका रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी आचोळे पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. तिने हे टोकाचं पाऊल का उचललं, याचा शोध पोलीस घेत आहेत.

अल्पावधीतच मिळवली प्रसिद्धी

अल्पावधीतच संचिता उगलेने टेलिव्हिजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होती. झी टीव्हीवरील 'कुमकुम भाग्य' मालिकेतील 'दिया टंडन' ही भूमिका विशेष गाजली होती. तसेच 'वागले की दुनिया' मालिकेतील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 'दिलवाली दुल्हा ले जाएगी' आणि 'साजन घर' यांसारख्या मालिकांमधील भूमिकांमुळे तिने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

टीव्हीसोबतच संचिताने चित्रपट क्षेत्रातही काम केले होते. विकी कौशल अभिनीत 'छावा' चित्रपटात तिने ताराबाईंची भूमिका साकारली होती. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांनी तिच्या कामाचे कौतुक केले होते.

logo
marathi.freepressjournal.in