मुंबई : राज्य सरकारने गुरुवारी ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गुरुवारी जारी झालेल्या आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची बदली आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए), पुणे येथे करण्यात आली आहे. तर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त गजेंद्र बावणे यांची बदली महावितरणच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी, छत्रपती संभाजीनगर झाली आहे.
अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे
डॉ. अपूर्वा बसूर : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे बदली
विशाल खत्री: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ
डोनुरू अनन्या रेड्डी : अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नांदेड यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती
पी.के. सिद्धार्थ रामकुमार: अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर म्हणून नेमणूक
कुश मोटवानी: अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नागपूर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, वर्धा तथा उपविभागीय अधिकारी, वर्धा म्हणून नियुक्ती
आकाश वर्मा: अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, वाशिम यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती
नंदला साईकिरण : अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंदिया यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा तथा उपविभागीय अधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती
योगेश कुमार मीना : अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, हिंगोली.
शिवांश सिंह : नंदुरबार येथील सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या शिवांश सिंह यांची गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा अहेरी उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.