महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या: हायकोर्टात `तारीख पे तारीख`; आता 'या' दिवशी सुनावणी

Swapnil S

मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर वर्षभर केवळ `तारीख पे तारीख`च सुरू आहे. शुक्रवारी पुन्हा मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती मिलींद साठ्ये यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी सोमवारी, ७ ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे. खंडपीठाने यापूर्वी पुढील आदेशापर्यंत नवीन नियुक्त्या करू नका, असा अंतरिम आदेशच राज्य सरकारला दिला असल्याने या नियुक्त्या लांबणीवर पडल्या आहे.

विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने नावांची शिफारस करून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तशी यादी पाठवली. या आमदारांच्या नियुक्त्या करण्यात राज्य सरकार चालढकलपणा करत आहे, असा आरोप करून शिवसेनेचे (ठाकरे) कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली आहे.

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

Pune Bopdev Ghat Gang-Rape Case: संशयित आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवा; शरद पवार यांची केंद्र सरकारला सूचना