राज्यातील महिला कर्करोगाच्या विळख्यात; १७ हजार महिलांना मुख कर्करोग | प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

राज्यातील महिला कर्करोगाच्या विळख्यात; १७ हजार महिलांना मुख कर्करोग

गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातील कर्करोग रुग्णांचा शोध घेत निदान व वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी राज्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात एक कोटी ५१ लाख १० हजार महिलांची तपासणी करण्यात आली असता १७ हजार ६१८ महिलांना मुख कर्करोगाचे निदान झाले. तर ४५० महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे सर्वाधिक संशयीत रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात ३,७४४ इतके, तर बुलढाणा जिल्ह्यात १,२६९ आणि अमरावती जिल्ह्यात १,४६० इतक्या महिला मुख आणि स्तन कर्करोगाने त्रस्त असल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभिमान संपूर्ण राज्यात राबवले असून या अभियानाद्वारे महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी सर्वत्र शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत केलेल्या आरोग्य तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून अनेक महिला कर्करोग आणि ॲनिमियाने ग्रासल्याचे समोर आले आहे. तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या अनेक महिला शिकार झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या महिलांच्या आरोग्याची काळजी घेत राज्य सरकारच्यावतीने उपचार दिले जात असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

महत्त्वाच्या सूचना

मंडळांच्या संकेत स्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही माहितीसाठी आहे असे मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी यानंतर छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षांच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि परीक्षेस विद्यार्थ्यांनी प्रविष्ठ व्हावे. मंडळाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रक ग्राह्य धरण्यात यावे. अन्य संकेत स्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा सोशल मीडिया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, असे आवाहन मंडळाने केले आहे. अशा अनधिकृत माहितीवरून होणाऱ्या नुकसानीसाठी मंडळ जबाबदार राहणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर