नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; लातूरच्या मैथिली सोनवणे हिचे टोकाचे पाऊल प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; लातूरच्या मैथिली सोनवणे हिचे टोकाचे पाऊल

लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील १८ वर्षीय विद्यार्थिनी मैथिली अशोक सोनवणे हिने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १६ मे रोजी उघडकीस आली.

Swapnil S

लातूर : लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील १८ वर्षीय विद्यार्थिनी मैथिली अशोक सोनवणे हिने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १६ मे रोजी उघडकीस आली. नीट परीक्षेच्या संदर्भातील अनिश्चिततेमुळे ती मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती तिचे वडील अशोक विठ्ठल सोनवणे यांनी गातेगाव पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केली आहे.

मैथिली ही अभ्यासू व महत्त्वाकांक्षी विद्यार्थिनी होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील पेपर चांगले गेल्याने ती आशावादी होती. मात्र, परीक्षा रद्द झाल्याच्या चर्चांमुळे व पुढे काय होणार याबाबतच्या चिंतेमुळे ती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती, असे कुटुंबीयांनी सांगितले.

गोंदेगाव शिवारातील स्वतःच्या शेतात १६ मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास तिने ओढणीच्या साहाय्याने लिंबाच्या झाडाला लटकून गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच गातेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मैथिलीचे वडील अशोक सोनवणे हे गोंदेगावचे पोलीस पाटील आहेत. त्यांच्या जबाबानुसार, परीक्षेच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या तणावातून मैथिलीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. मैथीलीच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

Pune : जेजुरीत दिंडीच्या ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

Mumbai : पायधुणीत ८ वर्षीय चिमुकलीवर सुरक्षारक्षकाकडून लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

बँकॉकमधील पबला भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर, Video

'जव्हार' ठरला १०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा पहिला तालुका; सर्व २६८ शाळांना तंबाखूमुक्त प्रमाणपत्र; व्यसनमुक्त समाजाकडे ऐतिहासिक पाऊल

'श्रीलंका' ठरले भारतीय लग्नांचे नवे हॉटस्पॉट; पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम; लोकप्रियतेत २५ टक्क्यांची वाढ