महाराष्ट्र

धरण परिसरात पोहायला गेलेल्या ९ मुली बुडाल्या

हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले

नवशक्ती Web Desk

खडकवासला धरण परिसरात पोहायला गेलेल्या नऊ मुली बुडाल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. गोर्‍हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी सात मुलींना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले, तर दोन मुली अद्याप बेपत्ता आहेत. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. या संदर्भात संपूर्ण माहिती अजून समोर आली नाही 

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस