''मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचे प्रतीक,'' दिल्ली निवडणूक निकालावर अजित पवार यांची प्रतिक्रिया 
महाराष्ट्र

''मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचे प्रतीक,'' दिल्ली निवडणूक निकालावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला मिळालेल्या ४० हून अधिक जागा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक आहेत. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्याने दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल.

Swapnil S

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला मिळालेल्या ४० हून अधिक जागा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक आहेत. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्याने दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल.

चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधांचे, देशाच्या राजधानीचे सर्वांगसुंदर शहर हे दिल्लीकरांचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्ली विधानसभेतील निर्णायक विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. तसेच दिल्लीत स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दिल्लीतील भाजपच्या यशामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कष्ट व निवडणूक व्यवस्थापनाचे मोठे योगदान आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनतही महत्वाची ठरली. आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासारख्या नेत्यांना पराभूत करून दिल्लीकरांनी भाजप आणि ‘एनडीए’च्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळालं नसले तरी या निवडणुकीतून आम्हाला खूप शिकायला मिळाले आहे. ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचे विश्लेषण करून भविष्यात देशपातळीवर पक्ष बांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल. दिल्लीसह तर देशातल्या अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल, असा निर्धारही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक