'दबाव गट' म्हणून काम करणार - अभिजित दीपके 
महाराष्ट्र

'दबाव गट' म्हणून काम करणार - अभिजित दीपके

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली आहे. संस्थात्मक उत्तरदायित्व (अकाउंटेबिलिटी) निश्चित करण्यासाठी हा युवा मोर्चा 'दबाव गट' म्हणून काम करेल, असे स्पष्ट करत सीजेपीचे कार्यकर्ते झारखंडला जाऊन आंदोलकांची भेट घेतील, असे त्यांनी सांगितले.

Swapnil S

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली आहे. संस्थात्मक उत्तरदायित्व (अकाउंटेबिलिटी) निश्चित करण्यासाठी हा युवा मोर्चा 'दबाव गट' म्हणून काम करेल, असे स्पष्ट करत सीजेपीचे कार्यकर्ते झारखंडला जाऊन आंदोलकांची भेट घेतील, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथे सीजेपीच्या कोअर टीमच्या बैठकीपूर्वी दीपके म्हणाले, लोकांचा न्यायव्यवस्था, राजकारण, माध्यम आणि निवडणूक आयोगावरील विश्वास उडाला आहे. आमच्या आंदोलनाला देशभर पाठिंबा मिळाला. हे आंदोलन केवळ शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित न राहता संस्थात्मक उत्तरदायित्वाचा मुद्दा बनले आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एका सशक्त जन-दबाव गटाची अत्यंत गरज आहे.

झारखंडला जाणार

झारखंड लोकसेवा आयोग आणि इतर भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी झारखंडबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या स्वतंत्र समितीमार्फत व्हावी, या मागणीसाठी रांची येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर २९ जुलैपासून परीक्षांचे उमेदवार बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देताना दिपके म्हणाले, आम्ही नक्कीच झारखंडला जाऊ, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि आंदोलनातील त्यांच्या प्रत्येक रास्त मागणीचे समर्थन करू.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार