महाराष्ट्र

देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कार ऊसाच्या ट्रॅक्टरवर आदळून चक्काचूर, लातूर-नांदेड महामार्गावर चौघांचा जागीच मृत्यू

देवदर्शनासाठी तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांची कार ऊसाच्या ट्रॅक्टरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील ड्रायव्हरसह चार भाविक जागीच ठार

Swapnil S

लातूर : देवदर्शनासाठी तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांची कार ऊसाच्या ट्रॅक्टरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील ड्रायव्हरसह चार भाविक जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला लातूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा भीषण अपघात रविवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास नांदेड रोडवरील महाळंग्रा शिवारात डी. बी. कॉलेजसमोर घडला.

नांदेड येथील रहिवासी शिवराज लंकाढाई, सोनू कोतवाल, कृष्णा चौधरी, शुभम लंकाढाई हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारमधून तुळजापूरला देवदर्शनासाठी जात होते. पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास लातूरजवळ महाळंग्रा शिवारात डी.बी कॉलेजसमोर रोडवर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरवर त्यांची भरधाव असलेली कार आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला असून कारचालकासह चौघेजण जागीच ठार झाले. तर शुभम लंकाढाई हा गंभीर जखमी झाला असून त्याला लातूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

महाराष्ट्रासह ५ राज्यांना दुष्काळाचा विळखा; केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती

Mumabi : तीन वर्षांनी प्रशासनाला जाग, EUS मशीन खरेदीचा ठराव गुंडाळणार, स्थायी समितीने २०२३ साली दिली होती मंजुरी

Mumbai : पालिकेच्या ३९० कनिष्ठ अभियंता भरतीचा मार्ग मोकळा; भरती प्रक्रियेला मिळणार गती

AI बनतोय मुलांचा शिक्षण सहाय्यक; 'क्राय' संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष