PM
महाराष्ट्र

वर्चस्व संपणार! गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेच्या १२ संचालकांचे तडकाफडकी राजीनामे

एसटी कर्मचारी जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच गंभीर आरोप केले होते.

Swapnil S

मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना धक्का बसला आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेवर निवडून आलेल्या १२ संचालकांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. या बँकेवर एकूण १९ संचालक आहेत. या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळातील सदावर्ते यांचे वर्चस्व संपुष्टात येणार आहे.

गेल्या वर्षी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी अगोदर या एसटी कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र घेतले होते. त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. महामंडळाच्या निवडणुकांमध्ये आपले पॅनलही त्यांनी उतरवले. सदावर्ते यांच्या याच पॅनलने १९ पैकी बारा जागांवर विजय मिळवला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या बँकेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप याच निवडून आलेल्या संचालकांकडून केला जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर संचालकांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

एसटी कर्मचारी जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, एसटी कर्मचारी सहकारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांचा आम्ही मार्गदर्शक म्हणून स्वीकार केला, पण ते आता सर्वांचे मालक व्हायला निघाले आहेत. त्यामुळे आमच्यासह एसटी जनसंघाने विरोध केला. बँकेच्या १९ संचालकांपैकी १४ जण सदावर्तेंच्या विरोधात आहेत. त्यांना सदावर्तेंकडून धमक्या अन् आलिशान गाड्यांची आमिषे दाखवल्याचा गंभीर आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केला होता. १२ संचालकांनी वेगळा गट निर्माण केल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे एसटी बँकेत तब्बल ४५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप या संचालकांनी केला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक