महाराष्ट्र

राज्यात AIMIMची जोरदार मुसंडी; १२५ नगरसेवक विजयी

मुंबईतील मुस्लीम लोकसंख्या असलेल्या भागात एमआयएमचे नेते असदुद्दीन औवेसी यांची जादू चालल्याचे दिसून येत असून एमआयएमच्या यशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील महापालिकांच्या निकालांमध्ये एमआयएमचे १२५ नगरसेवक निवडून आले असून त्यामध्ये मुंबईत ८ जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. मानखुर्द-गोवंडी या भागात एमआयएमने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला. मुंबईतील मुस्लीम लोकसंख्या असलेल्या भागात एमआयएमचे नेते असदुद्दीन औवेसी यांची जादू चालल्याचे दिसून येत असून एमआयएमच्या यशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

असदुद्दीन ओवैसींच्या एआयएमआयएम या पक्षाची मुसंडी पाहण्यास मिळाली. सोलापूरमध्ये ८, नांदेडमध्ये १५ तर धुळ्यात १० असे एकूण ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. अमरावती महापालिकेत १२, ठाण्यात ५, नागपूरात ६ ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यातील २९ पैकी १३ महापालिकांमध्ये एमआयएमचे १२५ नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमचे सर्वाधिक ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. मालेगाव महापालिकेत एमआयएमचे २० नगरसेवक निवडून आले आहेत. अहिल्यानगर २, जालना २, चंद्रपूर १, अकोला येथून ३ नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यात समाजवादी पक्षाला मागे सारत एमआयएमची सरशी झाली आहे.

Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजाराने स्थायी समिती तापली; अपुरे मनुष्यबळ, फॉगिंग मशीनमुळे सदस्य संतप्त

­शिक्षणानंतरही नोकरीची शाश्वती नाही; पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली खंत

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा