अजित पवार | संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

जंगलात बकऱ्या सोडण्याची सूचना हास्यास्पद - अजित पवार

बिबट्यांना मानवी वस्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी जंगलात बकऱ्या सोडण्याच्या राज्य वनमंत्र्यांच्या सूचनेची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी खिल्ली उडवली. बिबट्यांव्यतिरिक्त, गावातील लोकही या बकऱ्यांवर ताव मारतील, असे ते म्हणाले.

Swapnil S

नागपूर : बिबट्यांना मानवी वस्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी जंगलात बकऱ्या सोडण्याच्या राज्य वनमंत्र्यांच्या सूचनेची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी खिल्ली उडवली. बिबट्यांव्यतिरिक्त, गावातील लोकही या बकऱ्यांवर ताव मारतील, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांना शिकारीच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी जंगलात मोठ्या संख्येने बकऱ्या सोडाव्यात, अशी सूचना केली होती.

बिबट्याच्या हल्ल्यात चार लोक मारले गेले तर राज्याला १ कोटी रुपये (भरपाई म्हणून) द्यावे लागतात. म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगितले की, मृत्यू झाल्यानंतर भरपाई देण्याऐवजी १ कोटी रुपयांच्या बकऱ्या जंगलात सोडा, जेणेकरून बिबटे मानवी वस्तीत येणार नाहीत, असे मंत्री म्हणाले होते.

बिबट्यांच्या वाढत्या घटनांना तोंड देण्यासाठी सरकारच्या योजनांबद्दल विचारले असता, पवार म्हणाले की, बिबट्यांची पैदास होत आहे आणि ते महाराष्ट्राच्या काही विशिष्ट भागांमध्ये राहत आहेत.

बकऱ्यांवर गावकरीच ताव मारतील!

बिबट्यांऐवजी भक्ष्य म्हणून सोडलेल्या बकऱ्यांवर गावातील लोकच ताव मारतील, असे ते हसत म्हणाले. पत्रकारांशी अनौपचारिक संवादादरम्यान पवार म्हणाले की, ही कल्पना वनविभागातूनच आली असावी. नसबंदी हा एक प्रभावी पर्याय असू शकतो, परंतु त्याचा परिणाम केवळ दीर्घकाळानंतरच दिसून येईल. कारण नसबंदीनंतरही बिबटे अन्नासाठी शिकार करतच राहतील, असे पवार म्हणाले.

Mumbai : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हमाल, पार्किंग, एसी प्रतीक्षागृहाचे अधिकृत दर जाहीर; जादा पैसे घेतल्यास तक्रार करा

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं?