आता सीसीटीव्हीचा मुद्दा ऐरणीवर; अजित पवार अपघातप्रकरणी चाैकशीची मागणी 
महाराष्ट्र

आता सीसीटीव्हीचा मुद्दा ऐरणीवर; अजित पवार अपघातप्रकरणी चाैकशीची मागणी

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला साडेनऊ महिने उलटून गेले, तरी या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात होता की घातपात, याबाबत उपस्थित होणारे प्रश्न कायम असतानाच आता या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला साडेनऊ महिने उलटून गेले, तरी या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात होता की घातपात, याबाबत उपस्थित होणारे प्रश्न कायम असतानाच आता या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारच्या नागरी विमान सुरक्षा ब्युरोने तसेच मुंबई पोलिसांनीही संबंधित फुटेज देण्यास नकार दिला आहे.

विशेष म्हणजे, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांना दिल्याचे बीसीएएसने आपल्या अधिकृत उत्तरात स्पष्ट केले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांकडे फुटेज उपलब्ध असताना ते माहिती अधिकारातून मागणाऱ्या अर्जदाराला का दिले जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले. त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

विमानतळावरील फुटेज मागितले

अॅड. नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत मुंबई विमानतळावरील २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ६ ते सकाळी ९ या वेळेतील सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमानतळावरील हालचाली आणि त्या दिवशी घडलेल्या घटनांची माहिती मिळावी, या उद्देशाने त्यांनी हा अर्ज केला होता. मात्र, नागरी विमान सुरक्षा ब्युरोच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या उत्तरात संबंधित फुटेज देण्यास नकार दिला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

३ हजार ४२ धरणांमध्ये ६४ टक्केच पाणी; राज्यातील स्थिती चिंताजनक; गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात २६ टक्क्यांची घट

चीनला शह देण्याचे आखाडे; बळाच्या वापराने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकतर्फी कृतींना ‘क्वाड’ परिषदेत विरोध

'एसआयआर'बाबत ९ डिसेंबरला सुनावणी

एकमताने निर्णय झाल्याचा पुरावा नाही; निवडणूक आयोगाच्या दाव्याला याचिकाकर्त्याचे आव्हान

अण्णा आणि देश दोघांनाही चकवा लागला?