संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

'तो लोकांवर झेप घेण्याचा प्रयत्न करत होता'; अलिबागच्या नागावमध्ये बिबट्याचा धुडगूस; ५ जणांवर हल्ला

अनेक रहिवाशी गल्लींमधून जाताना तो ‘लोकांवर झेप घेण्याचा प्रयत्न करत होता,’ असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जवळच्या शाळेने विद्यार्थ्यांना तत्काळ वरच्या मजल्यावरील सभागृहात हलवले आणि पालकांना तत्काळ मुलांना घरी घेऊन जाण्याचे निर्देश दिले.

Swapnil S

रायना असैनर/ नवी मुंबई :

नागाव, अलिबागमध्ये मंगळवारी दिवसा बिबट्याने पाच जणांवर हल्ला केल्याने गावात खळबळ उडाली. वनविभाग व पोलिसांनी तातडीने बचावाची कारवाई सुरू केली. या दरम्यान सकाळी दोन रहिवासी जखमी झाले, तर दुपारी प्राण्याला पकडण्याच्या मोहिमेदरम्यान एका वनअधिकाऱ्यासह बचाव पथकातील तिघांना दुखापत झाली.

९ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता खालची आळीतील बालू सुतार यांच्या घरासमोरील वाडी (पारंपरिक घर) परिसरात हा बिबट्या प्रथम दिसला. ‘कंबरभर उंच, अतिशय आक्रमक आणि उघड्यावर फिरणारा मोठा बिबट्या’ पाहिल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर प्राणी एचडीएफसी बँकेजवळील भागातून नागावाडीच्या दिशेने पुढे सरकला. अनेक रहिवाशी गल्लींमधून जाताना तो ‘लोकांवर झेप घेण्याचा प्रयत्न करत होता,’ असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मुलांच्या सुरक्षेचा विचार करून जवळच्या शाळेने विद्यार्थ्यांना तत्काळ वरच्या मजल्यावरील सभागृहात हलवले आणि पालकांना तत्काळ मुलांना घरी घेऊन जाण्याचे निर्देश दिले.

वन अधिकाऱ्यांनी आणि पोलिस पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्या एका वाडीत आश्रय घेतल्याची पुष्टी केली. प्राण्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी मोहीम राबवण्यात आली, ज्यात तिघा बचाव कर्मचाऱ्यांना दुखापत झाली.

स्थानिक प्रशासनाने रहिवाशांना घरातच थांबण्याचे, अनावश्यक हालचाल टाळण्याचे आणि बचाव स्थळी गर्दी न करण्याचे आवाहन केले. ‘आम्ही ग्रामस्थांना प्रशासनाला सहकार्य करण्यास सांगितले असून घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आम्ही सतत लोकांना घरात राहण्यास आणि गर्दी टाळण्यास सांगत आहोत, पण ग्रामस्थ बचावस्थळी जमा होत असल्याने बिबट्या अधिक घाबरत आहे,” असे नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्या रस्ता विसरून फणसाड (रा. रायगड) येथून इथे आला असावा, असा संशय आहे, असे रायगडचे जिल्हा वन अधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले.

आज शोध मोहीम सुरू राहणार

सध्या अंधार असल्यामुळे बेशुद्ध करणारे औषध (ट्रँक्विलायझिंग) देणे कठीण आहे. त्यामुळे आम्ही बंदोबस्त वाढवणार असून बुधवारी सकाळी पुन्हा बचावकार्य करण्याचा प्रयत्न करू. बिबट्या स्वतःहूनही परत जाण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी घरातच राहावे, असे आम्ही सांगितले आहे,” असे जिल्हा वन अधिकारी पाटील म्हणाले.

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये आईनेच तब्बल ६ मुलांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

BCCI कडून अखेरच्या क्षणी IPL लिलाव यादीत मोठा बदल; माजी RCB खेळाडूसह नवीन ९ जणांचा समावेश

‘५०% रक्कम भरा आणि दंड मिटवा’, सरकारचा मोठा निर्णय : दंडाची रक्कम FASTag मधून वसूल होणार

Mumbai : गौरी गर्जे प्रकरणात SIT ची स्थापना; ऑडिओ क्लिप्समुळे पोलिसांच्या तपासाला वेग

Mumbai News : रिक्षाचालकाकडून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; किंचाळताच धावत्या रिक्षेतून ढकललं, आरोपीला अटक