महाराष्ट्र

आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंची मागणी

नवशक्ती Web Desk

"महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेला महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग दोषी असून संबंधित विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा," अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केली आहे. ते म्हणाले की, "नवी मुंबई मधील खारघर येथे झालेल्या सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्यांचा नेमका आकडा लपवला जात आहे," असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला.

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, "रविवारी घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी होती. मी रुग्णालयात येऊन रुग्णांची विचारपूस केली असून त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरु आहेत, यात शंका नाही. हा कार्यक्रम राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केला होता. सांस्कृतिक विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण याची जबाबदारी सरकारची होती. या घटनेमुळे सरकारचे नाव खराब झाले आहे. या विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा." अशी मागणी त्यांनी केली.

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

रात्री घराच्या अंगणात झोपलेल्या युवकाचा दगडाने डोके ठेचून खून, खटावमधील खळबळजनक घटना

कराड येथे तंदूर भट्टीच्या उष्णतेने ३० वर्षे जुने झाड जळाले; कारवाईची नगरपालिकेकडे मागणी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा