महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; वन विभागाने केली सात जणांना अटक  
महाराष्ट्र

महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; वन विभागाने केली सात जणांना अटक

आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करीचा पर्दाफाश करण्यात सातारा वनविभागाला यश आले आहे.

Swapnil S

कराड : आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करीचा पर्दाफाश करण्यात सातारा वनविभागाला यश आले आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरात सापळा रचून कारवाई करत वन विभागाने सुमारे ५.३०० किलो अंबरग्रीस जप्त करत महाबळेश्वर वन विभागाने दाखल करत सात जणांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली तर शुक्रवारी त्यांची वन विभागाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सातारा वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, साहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून एर्टिगा आणि टाटा नेक्सन या वाहनांतून आलेल्या सात जणांना ताब्ब्यात घेतले. वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये अंबरग्रीसचा साठा सापडला. ही कारवाई प्रदीप रौंधळ, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, महादेव मोहिते वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर, गणेश महांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा, सुनील लांडगे, वनपाल, यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली.

सात वर्षांची शिक्षा

जप्त केलेले अंबरग्रीस स्पर्म व्हेल (Physeter microcephalus) या दुर्मिळ व्हेल प्रजातीशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत या पदार्थाची विक्री, खरेदी, वाहतूक किंवा साठवण करणे गंभीर गुन्हा असून त्यासाठी ७ वर्षांपर्यंत कारावास व मोठ्या दंडाची तरतूद आहे. या प्रकरणी पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते करत आहेत.

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार

Navi Mumbai : पाडकाम रोखण्यासाठी कोर्टाचा बनावट आदेश बनवला; न्यायाधीशांचीच केली हुबेहूब खोटी सही, CBD पोलिसांत गुन्हा दाखल