महाराष्ट्र

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी याबाबतची अधिकृत घोषणा करतील.

विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजकुमार बडोले, संजय बनसोडे व अण्णा बनसोडे या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि यावेळी मंत्रीपदाची अपेक्षा असलेल्या अण्णा बनसोडे यांना अजितदादांनी उपाध्यक्षपदाची संधी दिली. उपाध्यक्षपदासाठी महायुतीकडून अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. तो सोमवारी दुपारी झालेल्या पडताळणीत वैध ठरला. त्यामुळे त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे.

पानटपरी ते आमदार असा प्रवास

राजकारणात येण्यापूर्वी अण्णा बनसोडे हे पानटपरी चालवायचे. हा व्यवसाय करत असताना ते राजकारणात सक्रिय झाले आणि १९९७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक बनले. अण्णा बनसोडे यांनी महापालिकेत तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. २०१४ मध्ये झालेला पराभव वगळता ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०२४ मध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अण्णा बनसोडे मंत्रि‍पदासाठी इच्छुक होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि २०२४ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेवर पोहोचले.

दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Mumbai : १३६ फेरीवाल्यांवर कारवाई; दहिसरमध्ये पादचारी प्रथम अभियानाला वेग

मराठा आरक्षण याचिका नव्या पूर्णपीठासमोर; न्यायमूर्ती कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपीठ, ९ ऑक्टोबरपासून होणार नव्याने सुनावणी

दोन गटांना दोन नावे,दोन चिन्हे; तृणमूल काँग्रेसमधील वादाबाबत निवडणूक आयोगाचा फैसला, ‘लोकशाहीतील काळा दिवस’

केंद्राच्या मदतीसाठी न थांबता मदत करू; दुष्काळी स्थितीबाबत फडणवीसांचा खुलासा