भोंदू अशोक खरात प्रकरण : खरात ED च्या ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला  (Photo - FPJ)
महाराष्ट्र

भोंदू अशोक खरात प्रकरण : खरात ED च्या ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला

नाशिकमधील भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या    अशोक खरात    याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई सुरू केली आहे.

Swapnil S

नाशिक : नाशिकमधील भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या    अशोक खरात    याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई सुरू केली आहे. ईडीने खरातला नाशिक मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेत मुंबईला नेले असून, त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. लैंगिक शोषण, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगसंदर्भातील आरोपांवरून ही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक न्यायालयातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ईडीच्या मुंबई कार्यालयाने खरातला ताब्यात घेतले. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला मुंबईला रवाना करण्यात आले. प्रतिबंधक मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) अंतर्गत त्याला विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ईडीकडून खरातच्या कथित बेनामी मालमत्तांची चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये आलिशान बंगल्यांपासून महागड्या वाहनांपर्यंत, बँक लॉकर, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान मालमत्तेचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि कथित गैरमार्गाने मिळवलेल्या पैशांच्या व्यवहारांचाही तपास केला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महिलांचे लैंगिक शोषण, धार्मिक श्रद्धांचा गैरफायदा घेत फसवणूक करणे आणि त्या माध्यमातून मिळालेल्या पैशांची अफरातफर व मनी लॉन्ड्रिंग केल्याप्रकरणी खरातची चौकशी होणार आहे.

अशोक खरात    याच्याविरोधात नाशिकसह राज्यातील विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. आता ईडीच्या प्रवेशामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता