महाराष्ट्र

Baramati : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुन्हा 'पवार विरुद्ध पवार'; युगेंद्र पवारांकडून इच्छुकांच्या मुलाखती

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून स्वतंत्र पॅनेल उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय संघर्ष पुन्हा सहकार क्षेत्रात दिसून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Swapnil S

पुणे : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून स्वतंत्र पॅनेल उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय संघर्ष पुन्हा सहकार क्षेत्रात दिसून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही या घडामोडींमुळे विराम मिळाल्याचे वृत्त आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी कारखाना निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्याकडेही इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू आहेत.

भाजप आणि शिवसेनेनेही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवणार की स्वतंत्र पॅनेल उभे करणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. युती न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी स्थानिक पातळीवर सुरू आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. त्यामुळे तोपर्यंत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होतात की स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन